शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पालकाची नजर चुकवून दुसऱ्या रेल्वेत चढला; कोकण रेल्वेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडला

By सूरज.नाईकपवार | Updated: April 5, 2024 21:40 IST

गोव्यातील मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर आज शुक्रवारी ही घटना घडली.मूळ उत्तर प्रदेश राज्यातील गाजीपुर येथील हे कुटुबिय असून ते गोव्यात सहलीसाठी आले होते.

मडगाव: पालकाची नजर चुकून दुसऱ्या रेल्वेमध्ये चढलेला एक सहा वर्षीय मुलगा कोकण रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखविल्यामुळे सापडला. आपला मुलगा सापडल्याची माहिती सबंधीत पालकांना मिळाल्यानंतर त्यांचाही जीव भांडयात पडला. पोलिस त्यांना देवाच्या रुपानेच मदतीला धावून आले.

गोव्यातील मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर आज शुक्रवारी ही घटना घडली.मूळ उत्तर प्रदेश राज्यातील गाजीपुर येथील हे कुटुबिय असून ते गोव्यात सहलीसाठी आले होते. परतीच्या प्रवासाला जाताना वरील घटना घडली. मडगाव ते नागपुर रेल्वेतून ते जाणार होते. मडगाव रेल्वे स्थानकावर ते रेल्वेची प्रतिक्षा करीत होते. त्याच वेळी प्लॅटफॉमवर अन्य एक रेल्वेने थांबा घेतला होता. तो मुलगा आपल्या पालकाची नजर चुकवून त्या रेल्वेत चढला. रेल्वेने पुढील प्रवास केल्यानतंर त्या मुलाच्या पालकाची एकच धावपळ उडाली. नंतर त्यांनी लागलीच याबाबत कोकण रेल्वे पोलिसांना माहिती दिली.

पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य पोलिसांनी तपास करुन यासंबधी करमळी पोलिस ठाण्यात माहिती दिली. करमळी येथे ती रेल्वे पोहचताच पोलिसांनी त्या मुलाला शोधून काढले. व्हिडीओ कॉलवर त्या मुलासोबतची माहिती त्याच्या पालकांना दिली. तोच मुलगा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला मडगावात आणून पालकाच्या स्वाधीन केले.