शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

न्याहारीसाठी ब्रेडचे पॅकेट फोडले असता सापडली उंदराची विष्ठा, गोव्यात घडला प्रकार

By सूरज.नाईकपवार | Updated: October 21, 2023 18:01 IST

गोव्यातील दक्षिण गोवा येथील  लोटली येथे ही घटना घडली.

मडगाव - न्याहारासाठी ब्रेडचे पॅकेट फोडले असता, आतमध्ये उंदराच्या लेंडया सापडण्याची खळबळजनक घटना घडली आहे. गोव्यातील दक्षिण गोवा येथील  लोटली येथे ही घटना घडली.एफडीएने या एकंदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. खात्याचे दक्षिण गोव्याचे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांनी त्वरीत कारवाई करताना संबधित कारखान्याला नोटीस बजावून उंदीर व इतर कीटकांवर नियत्रंण आणण्यासाठी तात्काळ पेस्ट कंट्रोल प्रक्रिया करण्याचा आदेश दिला आहे. ही प्रक्रिया होईपर्यंत या ब्रेडचे उत्पादन बंद करण्याचाही आदेश दिला आहे.

साकवाळ येथील आरिश बेकरीकडून तयार केल्या जाणाऱ्या जेसिया सॅन्डवीच ब्रेड या पॅक केलेल्या उत्पादनात लोटली येथील एका ग्राहकाला उंदराच्या लेंडया सापडल्या. शुक्रवारी सकाळी हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. शाळेत जाणाऱ्या पाल्यांसाठी ब्रेकफास्ट बनविण्यासाठी एका महिलेने हे ब्रेड आणले होते. ते उघडले असता त्या ब्रेडच्या तीन स्लाईसमध्ये उंदराच्या लेंडया सापल्या. नंतर या महिलेने गोवा कॅनशी संपर्क साधला. नंतर गोवा कॅनने या संबधी एफडीएच्या दक्षिण गोवा कार्यालयात तक्रार केली. मागाहून एफडीएने या बेकरीत जाउन तेथे तपासणी केली. एफडीएचे अधिकारी नोरोन्हा यांच्याशी संपर्क साधला असता, या बेकरीच्या विरोधात एफडीए कायद्याच्या ३२ कलमाखाली नोटीस बजाविली असून, चौकशी चालू असल्याचे सांगितले.

टॅग्स :goaगोवा