शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनो कनेक्ट असलेल्या एकाने ‘त्यांच्या’ सोयीसाठी विकत घेतले १५० कोटींचे हॉटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 08:48 IST

विशेष ‘स्टाफ’ आणि ‘अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांची सोय’ : अडचणीचे ठरू नये म्हणून खबरदारी

नरेश डोंगरे / आशिष रॉयपणजी (गोवा) : विशेष ‘स्टाफ’ आणि वारंवार येणारे ‘अतिमहत्त्वाचे पाहुणे’ यांच्यासाठी वारंवार महागडे हॉटेल करणे अडचणीचे ठरते म्हणून कॅसिनो लॉबित कनेक्ट असलेल्या एकाने गोव्यात चक्क दीडशे कोटींचे हॉटेलच खरेदी केले. संबंधित वर्तुळात या हॉटेल खरेदीमागची पार्श्वभूमी आणि त्याच्याशी संबंधित किस्से रंगवून सांगितले जातात.  

गोव्यात कॅसिनोचा धंदा नोटा छापण्याच्या कारखान्यासारखा ठरला आहे. त्याचमुळे एकाचे दोन आणि दोनाचे चार कॅसिनो सुरू करून आपला कॅसिनो ग्रुप (समूह) काहींनी तयार केला आहे. यातून रोज नोटांची पोती भरली जाते. कॅसिनोत येणाऱ्यांना वेगवेगळी सेवा देण्यासाठी त्यांचे मनोरंजन करण्यासाठी काही विशेष स्टाफचीही नियुक्ती आहे. या विशेष स्टाफच्या राहण्या- खाण्याची आणि अन्य सेवांचीही विशेष खबरदारी कॅसिनो संचालकाकडून घेतली जाते. त्यांचे तसे विशेष मूल्यही त्यांना दिले जाते, असे सांगण्यात आले.

‘ते’ पाहुणे कोण? याच्याशीच दुसरी एक बाब संलग्न आहे. ती म्हणजे, कॅसिनोवर काही ठिकाणचे अतिमहत्त्वाचे पाहुणे नियमित येतात. त्यांनाही विशेष सेवा दिली जाते. अशा पाहुण्यांचीही मोठी वर्दळ असते. त्यांना सेवाही थ्री स्टार, फाइव्ह स्टारच हवी असते. त्यामुळे अशांना वारंवार महागड्या हॉटेलमध्ये ठेवणे अडचणीचे ठरू शकते, हे लक्षात आल्यामुळे की काय एका कॅसिनो संचालकाने ‘विशेष स्टाफ, विशेष अतिथी आणि विशेष सेवा’ यासाठी गोव्यात चक्क दीडशे कोटींचे एक हॉटेलच खरेदी केल्याचे सांगितले जाते. या हॉटेलच्या खरेदीचे अनेक किस्से चर्चेला असले तरी याबाबत अधिकृत माहिती मात्र कुणाकडून मिळत नाही.

गोवा, पणजीत अनेक सदनिका  कॅसिनोत सेवा देणाऱ्या स्टाफला आणि कनेक्टिंग पिपल्सला हॉटेल, लॉजमध्ये ठेवणे परवडण्यासारखे नाही. ही मंडळी नेहमी नजरेस पडू शकते त्यामुळे पुढे समस्या निर्माण होऊ शकते, हे लक्षात घेत या मंडळीसाठी गोवा, पणजीतील अनेक सदनिका भाड्याने घेण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या भागात ही मंडळी भाड्याच्या सदनिकेत राहायला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आणखी काही हॉटेल, सदनिका विकत घेण्याची तयारी सुरू असल्याचेही असल्याचेही बोलले जाते.