शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पर्तगाळ येथे रंगणार रामभक्तीचा महामेळा; ५५० कोटी वेळा नामजप अभियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:02 IST

पर्तगाळ जिवोत्तम मठाचा सार्ध पंचशतमानोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठाच्या ५५० वर्षपूर्तीनिमित्त साजरा होणारा सार्ध पंचशतमानोत्सव २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत होत आहे. पर्तगाळी मठ येथे आयोजित केलेल्या या भव्य-दिव्य, ऐतिहासिक उत्सवात देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होणार आहेत. शुक्रवारी, दि. २८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारा श्रीरामाच्या भव्य पुतळ्याचे अनावरण हे मुख्य आकर्षण असणार आहे.

पर्तगाळ जिवोत्तम मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी या सोहळ्यात सरकारचे प्रतिनिधी असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, उद्योजक शिवानंद साळगांवकर व इतर मान्यवर उपस्थित होते. ११ दिवस चालणाऱ्या या उत्सवात आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची समृद्ध मालिका आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी पालिमारू मठाधीश परमपूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी, पत्ताशीष्य श्रीमद विद्यराजेश्वर तीर्थ स्वामी, संस्थान गौडपादाचार्य कवळे मठाधीश श्रीमद शिवानंद सरस्वती स्वामी आणि चित्रापूर मठाधीश श्रीमद सयोक्त शंकराश्रम स्वामी उपस्थित राहणार आहेत.

उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथे उभारलेली ७७ फूट उंच भगवान श्रीरामांची ब्रांझची मूर्ती. ही दक्षिण आशियात सर्वात उंच मानली जाते. यासोबतच १०,००० चौ. फूट क्षेत्रफळात रामायण थीम पार्क सज्ज केले असून भगवान श्रीरामांच्या आदर्शाचे दर्शन घडवणारे विविध विभाग, टपाल तिकीट प्रदर्शन, प्राचीन नाणी, विजयनगर साम्राज्यातील चित्रशैली यांचाही समावेश आहे.

५५० कोटी वेळा नामजप अभियान

उत्सवातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे 'सार्ध पंचशतकोटी श्री राम नाम जप' अभियान. पूज्य श्रीमद विद्याधीश तीर्थ वडेर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ५५० कोटी वेळा रामनाम जपाचा संकल्प पूर्ण केला जाईल.

या सोहळ्यादरम्यान देश-विदेशातील हजारो २ भक्त पर्तगाळ येथे येथील. उत्सवाचे थेट प्रक्षेपणही विविध माध्यमांद्वारे करण्यात येणार आहे. प्रथमच मठाच्या इतिहासात २४ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत सात दिवसांचा भजनी सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनाशी जोडला आहे.

शाळांना सुटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी, दि २८ नोव्हेंबरला पर्तगाळ येथे येणार आहेत. यामुळे वाहतूक व्यवस्थेकरीता काणकोणमधील सर्व शाळांना सुटी - देण्यात आली आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ram Bhakti Mahamela at Partagal; 550 Crore Nam Jap Campaign

Web Summary : Partagal Math celebrates 550th anniversary with a grand festival. PM Modi will unveil a 77-foot Rama statue. A Ramayana theme park and a 550 crore Ram Naam Jap campaign are also highlights. Schools in Canacona are closed for the event.
टॅग्स :goaगोवाspiritualअध्यात्मिक