शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता ओलांडताना ६ वर्षीय मुलाचा आला काळ

By पंकज शेट्ये | Updated: April 26, 2023 21:28 IST

चारचाकीची धडक बसल्याने झुआरीनगर येथील मुलाचा मृत्यू

वास्को: बुधवारी (दि.२६) संध्याकाळी दक्षिण गोव्यातील साकवाळ येथील महामार्गावर झालेल्या अपघातात ६ वर्षीय कुंदन ध्यानेश्वर राथोड नामक लहान मुलाचा दुर्देवी अंत झाला. कुंदन आणि त्याचे अन्य लहान मित्र महामार्गाचा रस्ता ओलांडताना समोरून आलेल्या एका चारचाकीची धडक कुंदन ला बसल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. त्याला त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले, मात्र इस्पितळात पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहीतीनुसार बुधवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास तो अपघात घडला. झरी, झुआरीनगर येथे राहणारा कुंदन राथोड नामक लहान मुलगा बिट्स पिलानी बाहेरील महामार्गाचा रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्याच वयाच्या त्याच्या इतर मित्रांनी रस्ता ओलांडला अन् कुंदन रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असतानाच समोरून आलेल्या चारचाकीची त्याला जबर धडक बसली. चारचाकीची धडक बसल्याने ६ वर्षाचा कुंदन गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले.

मात्र इस्पितळात पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. कुंदन याला धडक दिलेल्या त्या चारचाकी चालकाचे नाव कपील बेटगीरी असे असल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक शेख यांनी दिली. वेर्णा पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच कुंदनच्या मृतदेहाचा पंचनामा करून त्याचा मृतदेह मडगावच्या जिल्हा इस्पितळाच्या शवगृहात पाठवून दिला आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्राशियस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.

टॅग्स :Accidentअपघातgoaगोवा