शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

९६ वर्षांचे प्रभाकर बनवतात गणेशमूर्ती; १४व्या वर्षांपासून जडली कलेची आवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 09:23 IST

आता ते सुमारे २०० गणेशमूर्ती ते बनवतात.

लोकमत न्यूज नेटवर्क पोबुर्पा : पोंबुर्पा कलाकार प्रभाकर शेट शिरोडकर हे वयाच्या ९६व्या वर्षीही गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. वयाच्या १४व्या वर्षी त्यांना गणेशमूर्ती बनवण्याची आवड निर्माण झाली. त्यावेळी बिठ्ठोण येथे असलेले गणपतीची मूर्ती बनवणारे एक कलाकार नोनी शिरोडकर यांच्याकडून गणपती बनवण्याची कला आत्मसात करून घेतली.

नोनी शिरोडकर हेसुद्धा गणपतीची मूर्ती बनवणारे राज शिरोडकर यांचे वडील होते. तेसुद्धा चांगले मूर्तिकार होते. त्यांच्याकडून मूर्ती बनवण्याचे काम प्रभाकर शिकले व नंतर त्याने पोंबुर्पा येथे डॉ. भोबे यांच्या घरात गणपती चित्रशाळा सुरू केली. त्यानंतर त्यांनी वेलोटी येथे घरी मूर्ती चित्रशाळा सुरू केली. आता ते सुमारे २०० गणेशमूर्ती ते बनवतात. प्रभाकर यांच्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय त्यांचे भाऊ कै. यशवंत, अमृत यांचा मुलगा प्रशांत हे करीत आहेत. राजेंद्र हे चांगल्याप्रकारे व्यवसाय पढे नेतात.

मानधनासाठी हेलपाटे नको

प्रभाकर हे फक्त गणपतीच्या मूर्तीच नव्हे तर वास्को येथे होणाऱ्या दामोदर सप्ताहासाठी मूर्ती (पार) बनवतात. गेली सुमारे ७० वर्षांहून अधिक काळ ते त्या सप्ताहासाठी मूर्ती बनवतात. एवढे कष्ट करूनसुद्धा ते म्हणतात की, आम्हाला सरकारकडून मानधन मिळते ते कमी मिळते व वेळेवर मिळत नाही. त्यासाठी पुन्हा पुन्हा सरकार दरबारी पायपीट करावी लागते. तसेच मानधनात वाढ करावी व ते मानधन वेळेवर मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.

 

टॅग्स :goaगोवाGanesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव