पणजी : ९.३१ कोटी रुपये किमतीचा मोठा अमली पदार्थांचा साठा अमली पदार्थविरोधी पथकाने शनिवारी रात्री पेडे-हणजुणे येथे जप्त केला. हा व्यवहार करणाऱ्या इटलीच्या नागरिकाला पकडले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स पकडले जाण्याची अलीकडील ही पहिलीच घटना आहे. शनिवारी रात्री ११.४५ वाजता अमली पदार्थविरोधी विभागाच्या पोलिसांनी हा छापा टाकला. हणजुणे येथील ग्रॅन्डे-पेडे या ठिकाणी एका विदेशी नागरिकाजवळ मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नियोजनबद्द सापळा रचून पोलिसांनी छापा टाकून संशयित विन्सेन्झो रेनोन (५४) या इटलीच्या नागरिकाला अमली पदार्थांसह पकडले. त्याच्याजवळ छोटे चौरस आकाराचे ३०,७५० एलएसडी पेपर सापडले. तो राहात असलेल्या त्याच्या घराची झडती घेतली असता, आणखी ४.७ ग्रॅम वजनाचे एलएसडी पेपर सापडले. आंतरराष्ट्रीय ड्रग्स मार्केटमध्ये या एकूण अमली पदार्थांची किंमत ९.३१ कोटी ९० हजार रुपये एवढी होते, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी दिली. (पान २ वर)
९.३१ कोटींचे ड्रग्स पकडले
By admin | Updated: February 2, 2015 02:35 IST