शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘कदंब’च्या ९00 चालकांना मिळणार धडे,  पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्चकडून शास्रशुद्ध वाहन चालविण्याचे प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 12:54 IST

गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणाºया कदंब परिवहन महामंडळाच्या ९00 चालकांना पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्च असोसिएशनकडून बसगाड्या चालविण्याचे शास्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे

पणजी : गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणाºया कदंब परिवहन महामंडळाच्या ९00 चालकांना पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्च असोसिएशनकडून बसगाड्या चालविण्याचे शास्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे. महामंडळाने इलेक्ट्रिक बसही आणली असून या बसचे उद्घाटन येत्या मंगळवारी ३0 रोजी होणार आहे. 

इंधनाची बचत करण्याच्यादृष्टीने कदंब चालकांना बसगाड्या चालविण्याचे शास्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महामंडळाने पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्च असोसिएशन या संस्थेबरोबर समझोता करार केला आहे. कालांतराने खाजगी बसगाड्यांच्या चालकांनाही असेच प्रशिक्षण दिले जाईल.  इंधन बचतीचे उद्दिष्ट आहेच, शिवाय चालकांनी सुरक्षितपणे बसगाड्या चालवाव्यात हादेखिल हेतू आहे. पेट्रोलियम कंझर्व्हेशन रीसर्च असोसिएशनचे कार्यकारी संचालक अलोक त्रिपाठी यांनी हे प्रशिक्षण तीन दिवसांचे असेल, असे सांगितले. कदंबच्या ९00 चालकांना प्रशिक्षण देण्यात येईल. वाहन चालविण्याची चालकांची पध्दत तपासून ज्या काही त्रुटी आढळतील त्यावर मार्गदर्शन केले जाईल. त्रिपाठी म्हणाले की,‘ ताशी ४0 ते ४५ किलोमिटर वेगाने बस हाकली तर इंधन बºयापैकी वाचविता येईल. प्रशिक्षणात याच गोष्टींचा अंतर्भाव करण्यात येईल. ३१ मार्च २0१९ पर्यंत या कराराची मुदत आहे. तथापि ९00 चालकांचे प्रशिक्षण सहा महिन्यातच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पाच उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींची निवड करुन १६ जानेवारी २0१९ रोजी ‘सक्षम दिनी’ त्यांच सन्मान केला जाईल.

कॅब सेवेचाही विचार दरम्यान, ‘कदंब’ने टॅक्सी कॅब सेवा सुरु करण्यासाठी शक्याशक्यता अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हा अहवाल आल्यानंतरच राज्यात अ‍ॅपधारित कॅब सेवा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले. कदंब चालकांकडून सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड महामंडळ करीत नाही. वरचेवर अपघात घडविणाºया चालकांना दंड म्हणून पगारवाढ रोखली जाते, असे आल्मेदा यांनी एका प्रश्नावर सांगितले.