शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात कोविड प्रमाणपत्र सक्तीचे केल्यास ९० टक्के हॉटेल आरक्षण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 23:41 IST

मंत्री मायकल लोबो यांनी तर कोविड प्रमाणपत्र सक्तीचे केल्यास गोव्याच्या पर्यटनाला लगेच मोठा फटका बसेल असे सांगत हॉटेलमधील ९० टक्के खोली आरक्षण रद्द होईल, अशी भीती व्यक्त केली.

पणजी : परप्रांतांमधून जे कुणी गोव्यात येतात, त्यांच्यासाठी कोविडचे प्रमाणपत्र सक्तीचे केले जावे अशा प्रकारचा विचार आरोग्य मंत्री  विश्वजित राणे हे व्यक्त करत असले तरी, प्रत्यक्षात सरकारला ही सूचना मान्य नाही. मंत्री मायकल लोबो यांनी तर कोविड प्रमाणपत्र सक्तीचे केल्यास गोव्याच्या पर्यटनाला लगेच मोठा फटका बसेल असे सांगत हॉटेलमधील ९० टक्के खोली आरक्षण रद्द होईल, अशी भीती व्यक्त केली.

मध्यंतरी कोविड संकट व लॉकडाऊनचा गोव्याला मोठा फटका बसला. पर्यटन व्यवसायिकांची सगळी गणिते कोलमडली. आता नव्याने स्थिती रुळावर येत असतानाच कोविड रुग्ण संख्या राज्यात नव्याने वाढत आहे. शिवाय शेजारील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये व अन्य काही राज्यांतही कोविड रुग्णसंख्या खूप वाढली. या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांनी अधिक काळजी घ्यावी अशी सूचना मंत्री राणे यांनी नुकतीच केली. गोव्यात जे पर्यटक येतात, त्यांच्यासाठी कोविड निगेटीव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्याचा पर्याय सरकारने विचारात घ्यावा असे राणे यांनी सूचविले होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र अशा प्रकारच्या प्रमाणपत्राची सध्या गरज नाही असे मत बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान, कळंगुटच्या किनारी भागाचे आमदार असलेले मंत्री लोबो हे हॉटेल व्यवसायिकही आहेत. त्यांनी कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीची झाल्यास पर्यटनावर नव्याने परिणाम होईल असे सांगितले. गोवा हे सुरक्षित राज्य मानून पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. कोविड निगेटीव प्रमाणपत्र सक्तीचे केल्यास लगेच पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवू लागतील असे लोबो म्हणाले. गोव्यातील टेक्सी, शेक व अन्य व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहेत ही गोष्ट अन्य मंत्रीही मान्य करतात.