शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील नऊ खाण ब्लॉक लवकरच कार्यरत: मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 08:26 IST

पर्यावरणीय दाखलेही लवकरच मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : यावर्षी राज्यात खाणी मोठ्या प्रमाणात सुरू होतील. नऊ खाण ब्लॉक लवकरच कार्यरत होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत १२ खाण ब्लॉकचा लिलाव झालेला आहे. त्यातील नऊ खाण ब्लॉक लवकरच सुरू होतील. उर्वरित खाण ब्लॉकसाठी पर्यावरणीय दाखल्यांबाबत केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालय लवकरच निर्णय घेणार आहे. सावंत यांनी गोवा भेटीवर असलेले केंद्रीय खाणमंत्री जी किशन रेड्डी यांच्यासोबत बैठक घेतली. केंद्र आणि गोवा सरकारचे अधिकारीही बैठकीत सहभागी झाले होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात उपलब्ध असलेल्या संभाव्य खाण ब्लॉकसाठी लिलाव योजना, कार्यरत नसलेल्या खाणींच्या पुनरुज्जीवनासाठी लिलाव योजना, कालबाह्य झालेले भाडेपट्टे, एमएमडीआर कायद्याच्या कलम १० अ २ अंतर्गत रद्द झालेले भाडेपट्टे यावर चर्चा आणि विचारविनिमय झाला.

लिलाव केलेल्या खाणकामांच्या कार्यान्विततेची स्थिती, खनिज शोध प्रकल्पांची स्थिती आदी विषयावर चर्चा झाली. राज्यातील खाणींचे पुनरुज्जीवन राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास हातभार लावत आहेत आणि राज्यातील एकूण घरगुती उत्पन्न योगदान वाढवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि केंद्रीय खाण मंत्रालयाच्या सतत पाठिंब्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

गोवा भेटीवर आलेले रेड्डी यांच्या हस्ते एक्सप्लोरेशन लायसन्स ब्लॉक्सच्या लिलावाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ काल झाला. खासगी क्षेत्राच्या सहभागाद्वारे खनिज क्षमता ज्यामध्ये दुर्मिळ पृथ्वी घटक (आरईई), झिंक, डायमंड, तांबे आणि प्लॅटिनम ग्रुप एलिमेंट्स (पीजीई) यांचा शोध घेणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. हॅकेथॉन २०२५ च्या 'मिनरल टार्गेटिंग युजिंग एआय' या विषयावर रोड शो देखील त्यांच्याहस्ते काल गोव्यात सुरू करण्यात आला.

सहा महिन्यांत पूर्ण क्षमतेने खाण व्यवसाय : जी. किशन रेड्डी

केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेड्डी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषांचे आणि निर्देशांचे काटेकोरपणे पालन करून गोव्यात पुढील सहा महिन्यांत पूर्ण क्षमतेने खाणी सुरू होतील. न्यायालयाचे निर्देश पाळूनच पर्यावरण, महसूल निर्मिती आणि रोजगार निर्मिती यासारख्या समस्यांना तोंड देत गोवा सरकार खाणकाम सुरू करत आहे.

राज्यातील खाणी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी गोवा सरकार गंभीर आहे. त्यासाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा करून राज्यातील खाण व्यवसाय लवकरच पूर्वपदावर येईल. गोव्यात एक-दोन महत्त्वाची खनिजे आढळून आली आहेत. लवकरच उत्खनन सुरू होणार आहे. एक्सप्लोरेशन लायसन्स ब्लॉक्सच्या लिलावाचा गोव्यालाही फायदा होईल. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत