पणजी : तीन वर्षांच्या खाणबंदीनंतर गोव्यातून पहिली खनिज निर्यात सोमवारी झाली. सेसा वेदांताचे ८८ हजार टन खनिज चीनला रवाना झाले. येथील लघू बंदरात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खनिजवाहू जहाजाला बावटा दाखवून मोसमातील पहिल्या निर्यातीचा शुभारंभ केला. खनिज निर्यातीवरील १0 टक्के कर काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. खाण उद्योगाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची हमी पार्सेकर यांनी दिली. ट्रकमालक, बार्जमालक तसेच खाण व्यवसायातील अन्य घटकांनी (पान ४ वर)
८८ हजार टन खनिज चीनला रवाना
By admin | Updated: October 20, 2015 02:19 IST