शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियंत्रणासाठी 800 पोलीस उतरणार रस्त्यावर

By वासुदेव.पागी | Updated: December 23, 2023 17:14 IST

पर्यटनस्थळांवर या काळात अधिक लक्ष दिले जाईल

पणजी: नववर्ष प्रारंभ आणि नाताळ या दोन्ही कारणामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी व्यवस्था लावली आहे. संपूर्ण राज्यभर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ८०० पोलिसांची फौज तैनात करणार असल्याचे  वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले आहे. 

पर्यटनस्थळांवर या काळात अधिक लक्ष दिले जाईल. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत जास्तीत जास्त पोलीस रस्त्यावर वाहतुकीचे देखरेख करतील.  एरवी सामान्य काळात वाहतूक नियंत्रणासाठी 500 पोलीस कर्मचारी तैनात असतात. आता ती तीनशे ने वाढवली जाईल. कळंगूट आणि बागा किनारपट्टीत पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे येथे विशेष लक्ष दिले जाणार आहे. सनबर्न महोत्सवासाठीही २६ डिसेंबरपर्यंत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला जाईल.  दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अल्कोमीटर  घेऊन तैनात असतील.  शुक्रवारी दिवसभरात २६ मद्यपी चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान डिसेंबरचे शेवटचे पाच दिवस तसेच नववर्षी दिनी अधिक काळजी घेऊन वाहने चालविण्याचे आवाहन त्यांनी केले.  कुठाळी नदीवरील नवीन फुलाची दुसरी बाजू ही आता वाहतुकीस तयार झाल्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. हा पूल 24 तारखेपासून खुला होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये झालेल्या बुकिंग्स आणि इतर माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी राज्यात फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस