शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी विमानतळावर प्रवाशाकडून ७ लाख ६४ हजारांची विदेशी चलने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 19:29 IST

गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून बेकायदेशीररित्या शारजा देशात ७ लाख ६४ हजार रुपयांची विदेशी चलने घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाला शनिवारी पहाटे कस्टम विभागाने ताब्यात घेऊन नंतर ही चलने जप्त केली.

वास्को: गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून बेकायदेशीररित्या शारजा देशात ७ लाख ६४ हजार रुपयांची विदेशी चलने घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका प्रवाशाला शनिवारी पहाटे कस्टम विभागाने ताब्यात घेऊन नंतर ही चलने जप्त केली. हा प्रवासी पहाटे ‘एअर अरेबिया’ विमानातून शारजाला जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र त्याच्या हावभावावरून कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्याच्या सामानाची तपासणी केली असता बॅगेत लपवून ठेवलेल्या एका पाकीटातून विविध विदेश चलने आढळल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली.दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे सदर कारवाई करण्यात आली. ‘एअर अरेबिया’ चे जी ९- ४९३ हे विमान प्रवाशांना घेऊन दाबोळी विमानतळावरून शारजाला जाण्यापूर्वी येथे प्रवाशांची तपासणी करण्यात येत होती. तपासणीच्या वेळी एका प्रवाशावर कस्टम विभागाच्या अधिका-यांना संशय आल्याने त्यांनी त्वरित त्याच्या सामानाची कसून तपासणी केली. यावेळी त्याच्या एका बॅगेत त्यांने पाकिटात विविध विदेशी चलने लपवून ठेवल्याचे आढळून आले. बेकायदेशीर रित्या हा प्रवाशी सदर विदेशी चलने शारजा येथे नेत असल्याचे कस्टम अधिका-यांना तपासणीच्या वेळी स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी ह्या प्रकरणात कारवाई करून कस्टम कायद्याखाली सदर विदेशी चलने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या ह्या विदेशी चलनांची भारतीय किंमत ७ लाख ६४ हजार रुपये असल्याची माहिती अधिका-यांनी दिली. दाबोळी विमानतळावरील कस्टम कमिश्नर आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.गेल्या दहा महिन्यात दाबोळी विमानतळावर ७५ लाख १४ हजार रुपयांची विदेशी चलने करण्यात आली जप्त

दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिका-यांनी एप्रिल २०१८ ते आता पर्यंत विविध कारवाया करून येथे आलेल्या विविध प्रवाशांकडून बेकायदेशीररित्या नेण्याचा प्रयत्न करत असलेले ७५ लाख १४ हजार रुपयांच्या विदेशी चलने जप्त केल्या आहेत. ३१ मार्च २०१९ ला हे आर्थिक वर्ष संपणार असून तो पर्यंत दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकारी आणखीन केवढ्या कारवाया करून बेकायदेशीररित्या माल हाताळणी करणा-यांना पकडणार हे येणा-या काळात स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :goaगोवा