शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

६८ वर्षांनंतरही देशात घटनात्मक लोकशाही नाही -न्या. गोपाला गोवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 19:52 IST

स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनंतरही आपल्या देशात घटनात्मक लोकशाही आलेली नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही गोपाला गोवडा यांनी मिरामार पणजी येथे आयोजित स्व थाल्मन परेरा स्मृतीनिमित्त आयोजित पहिल्या व्याख्यानमालेत बोलताना केले. 

पणजी - स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनंतरही आपल्या देशात घटनात्मक लोकशाही आलेली नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही गोपाला गोवडा यांनी मिरामार पणजी येथे आयोजित स्व थाल्मन परेरा स्मृतीनिमित्त आयोजित पहिल्या व्याख्यानमालेत बोलताना केले. न्या. गोवडा म्हणाले की स्वातंत्र्यानंतर देशात संसदीय लोकशाही आली, परंतु घटनात्मक, म्हणजे लोकांची लोकशाही मात्र आलीच नाही. अतापर्यंतच्या ६८ वर्षातही ती आणणे शक्य झाले नाही हे ढळढळीत सत्य आहे. सांसदीय लोकशाही व घटनात्मक लोकशाही यात फार फरक आहे. घटनात्मक लोकशाही म्हणजे घटनात नमूद करण्यात आलेल्या तत्वांचा सन्मान करणे त्यांची अंमलबजावणी करणे आहे.  

भारतीय राजघटनेच्या प्रस्तावनेतच नमूद केलेल्या सर्वात महत्त्वाच्या तत्वाचे पालन करण्यात आलेले नाही आणि ते म्हणजे समानता. समानतेचा व्यापक अर्थ समान संधी. वास्तविक ६८ वर्षांनंतरही समानता आलेली नाही. या उलट भेदभावच फैलावत चाललेला दिसत आहे. मग तो भेद भाव जाती धर्माच्या नावावर असो, किंवा  लिंगभेदाच्या बाबतीत असो. महिला सशाक्तीकरणासाठी सरकारने कायदे केले. परंतु अंमलबजावणीचे काय? अजूनही प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही. विधीमंळातही महिलांना प्रतिनिधीत्व मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे असे ते म्हणाले. 

निधर्मी, सर्वभौम, आणि समाजवादी ही तत्वे घटनेचा मूळ ढाचा असून या ढाच्यालाच धक्का पोहोचलेला आहे. या तत्वांचे  महत्त्व जपले गेले नाही.  उलट जातीयवाद व मूलतत्ववाद उग्र बनताना दिसत आहे. घटनात्मक लोकशाही निर्माण करणे ही स्वातंत्र्योत्तर काळात घटनात्मक प्रक्रियेतून निवडून आलेल्या सरकारांची जबाबदारी असते. आपल्या राजकीय विचारधारा प्रस्थापन करणे हे सरकारचे काम नसते. परंतु आपण पाहिलीती केवळ सांसदीय लोकशाही घटनात्मक किंवा लोकांची लोकशाही आणली गेलीच नाही असे न्यायमूर्ती गोवडा यांनी सांगितले. 

गोव्यात पोर्तुगाल कायदा अजून अस्तित्वात असल्याने पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. परंतु त्यावर विशेष टीपण्णी त्यांनी केली नाही. देशात राखिवतेला घटना विरोधी मानून आव्हान देण्यात आले तेव्हा पंडित नेहरूनी विशेष घटना दुरूस्ती करून राखिवतेचे रक्षण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जमिनदारी मोडून काढण्यासाठीही नेहरूंनी केलेल्या कामाचा त्यांनी गौरव केला. अखील भारतीय वकील संघटनेच्या गोवा विभागाने मिरामार येथील साळगावकर कायदा महाविद्यालयात हे व्याख्यान आयोजित केले होते.