शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ६३५ नोंदणीकृत स्टार्टअप्स: मुख्यमंत्री प्रमोद सावंत;  ३.९ कोटी रुपयांचे अनुदान वितरित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:39 IST

उपक्रमांबाबत वाटचाल उल्लेखनीय

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात सध्या ६३५ डीपीआयआयटी नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत, ज्यापैकी १४७ लाभार्थ्यांना ३.९ कोटींचे अनुदान आधीच वितरित केले आहे. स्टार्टअपच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शन, बाजारपेठ प्रवेश आणि गती प्रदान करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आमचे राज्य स्टार्टअपमध्ये अग्रेसर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

बांबोळी येथील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या गोवा मार्केट अॅक्सेस एक्स्पो २०२५मध्ये प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री सावंत उपस्थित होते. यावेळी मंत्री रोहन खंवटे, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, डीआयटीई अंड सीचे संचालक कबीर शिरगावकर, इन्फोटेक कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वळवटकर, सीईओ डी. एस. प्रशांत यांची उपस्थिती होती.

नावीन्याची रूजवण : मंत्री रोहन खंवटे

मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले की, आमचे उद्दिष्ट राज्याला भारताची सर्जनशील राजधानी म्हणून स्थान देणे आहे. हे एक्स्पो येथे प्रतिभा आणि नावीन्याची रूजवण घालणारे एक चांगले व्यासपीठ ठरले आहे. गोवा केवळ स्टार्टअप्सना आकर्षित करीत नाही, तर त्यांना उद्देशाने उभारणी करण्यासाठी एक व्यासपीठ देत आहे. यापूर्वीदेखील आम्ही असे अनेक उपक्रम राबविले आहेत.

आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल

राज्याच्या धोरणांना स्टार्टअप इंडिया आणि डिजिटल इंडिया सारख्या राष्ट्रीय मोहिमांशी जुळवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमचे प्रयत्न केवळ राज्याच्या विकासासाठीच नाही, तर आत्मनिर्भर भारतालाही हातभार लावण्यासाठी आहेत. यासाठी, आम्ही एक जागतिक क्षमता केंद्र स्थापन करीत आहोत, जे आयटी कंपन्या, स्टार्टअप्स आणि उदयोन्मुख उद्योगांना वाढण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, समर्थन आणि व्यवसाय करण्याची सोय प्रदान करेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत