पणजी : सेरूला कोमुनिदाद जमीन घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागाकडून या प्रकरणातील संशयितांच्या अटकेचे सत्र सुरू करण्यात आले आहे. जमीन विकत घेणाऱ्यांना पहिला फटका बसला असून ६ जणांना सीआयडीकडून अटक करण्यात आली आहे. सेरूला कोमुनिदाद प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यात आला असून आता संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस कोठडीत गेलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे, महम्मद हनिफ बडेखान, प्लॉट क्रमांक १२, सर्वे क्रमांक ५/१, सुकूर-पर्वरी, अल्ताफ अब्दुल खान, प्लॉट क्र. ३१, सर्वे क्रमांक ५/१ सुकूर, संतोष मधुकर गजिनकर, प्रुडंशियल हाउस, चोगम रोड, पर्वरी, किशोर दत्ताराम कुडणेकर, घर क्र. ६२/५, गवळेभाट-चिंबल, संयुक्ता संदेश नागवेकर, एल ८१ हाउसिंग बोर्ड-पर्वरी व सोनिया सतीश वानखडे घर क्र. ९२३/२०४, साई पोलीस कॉलनीजवळ सुकूर. सर्व संशयितांविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम ४०३, ४०९, ४६८, ४७१, ४२० १/६ (३४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फसवणूक करणे, मालमत्ता हडप करणे, विश्वासघात करणे, कागदपत्रात फेरफार करणे, खोटी कागदपत्रे सादर करणे व एकत्र येऊन कारस्थान रचणे असे गुन्हे त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. सीआयडीचे अधीक्षक कार्तिक कश्यप म्हणाले, या प्रकरणी अजूनही तपास चालू आहे. या संशयितांकडून सहकार्य मिळाले नाही. प्लॉट मिळविण्यासाठी त्यांनी खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केली. अधिक तपासासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
सेरूला कोमुनिदादप्रकरणी ६ जण अटकेत
By admin | Updated: July 18, 2014 02:06 IST