शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:31 IST

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देत महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराईच्या जत्रोत्सवात शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. यात सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर ८० जण जखमी झाले असून यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देत महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.

शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री सावंत यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय समितीची बैठक घेतली. या बैठकीत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची तर जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीत्ते, उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर, पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी, पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश दिले.

नेमके काय घडले? लईराई देवस्थानचे अध्यक्ष दिनानाथ गावकर म्हणाले की, पहाटे अग्निदिव्यावेळी धोंडाच्या दोन गटांमध्ये काहीतरी वाद झाला व नंतर धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर गर्दी उसळली, त्यातील काहीजण जत्रेनिमित्त लावण्यात आलेल्या स्टॉलवर पडले व त्याचवेळी स्टॉलला वीजपुरवठा करणाऱ्या केबलला स्पर्श झाल्याने शॉक बसला आणि गोंधळ उडाला. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन सहा निष्पात भाविक व धोंडांचा मृत्यू झाला.

टॅग्स :goaगोवा