शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतींमधील विनावापर ४२३ भूखंड नव्या गुंतवणूकदारांकडे हस्तांतरित करणार - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: June 25, 2024 15:20 IST

आजारी उद्योगांसाठी 'एक्झिट सपोर्ट योजना' जाहीर.

किशोर कुबल/पणजी : औद्योगिक वसाहतींमध्ये विनावापर पडून असलेले ४२३ भूखंड नव्या गुंतवणूकदारांकडे हस्तांतरित केले जातील. सरकारने आजारी उद्योगांसाठी 'एक्झिट सपोर्ट योजना' जाहीर केली असून पडून असलेली तब्बल१२ लाख ७५ हजार चौरस मीटर जमीन वापरात आणली जाईल. उद्योजकांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली.

ते म्हणाले की, अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये बऱ्याच वर्षांपासून भूखंड विनावापर आहेत .काही जणांनी कारखान्यांसाठी शेड बांधलेली आहे. परंतु ती वापरात नाही. काही उद्योजकांनी अर्धवट बांधकाम करून ठेवले आहे. या सर्व जणांना आता अखेरची एकदा संधी दिली जाईल. त्यानंतर सरकार हे सर्व भूखंड नव्या उद्योजकांसाठी पोर्टलवर जाहीर करील व ते हस्तांतरित केले जातील. उद्योजकांनी पूर्वी ज्या दराने भूखंड खरेदी केले होते तो दर न देता नवीन दर त्यांना दिला जाईल.'

मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योग चालावेत यासाठी सरकारने त्यांना वीज सवलत तसेच अन्य बऱ्याच सवलती दिलेल्या आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये वीज पुरवठा सुधारण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे कामही चालू आहे. तरी देखील अनेक उद्योग बंद आहेत. सर्वेक्षणात सध्या ४२३ उद्योग आम्हाला असे आढळून आलेले आहेत. ही संख्या आणखीही जास्त असेल. जे बंद उद्योग आहेत किंवा विना वापर ठेवलेली जमीन आहे ती आता नव्या उद्योजकांकडे हस्तांतरित केली जाईल. जेणेकरून राज्यात नोकऱ्याही निर्माण होतील आणि रोजगाराची संधीही मिळेल.एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, औद्योगिक विकास महामंडळ एकेकाळी ७५ कोटी रुपये तोट्यात होते. आज महामंडळाकडे २०० कोटी रुपयांहून अधिक निधी आहे. सेझ जमिनींचा लिलांव चालूच राहणार आहे.'

पत्रकार परिषदेस उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो, औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार रेजिनाल्द लॉरेन्स, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल व इतर अधिकारी उपस्थित होते.आजच्या बैठकीत भाग घेतलेल्या उद्योजकांमध्ये व चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे तसेच इतर उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता.

टॅग्स :goaगोवा