शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतींतील ४२३ भूखंड नव्याने हस्तांतरित: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2024 13:02 IST

आजारी उद्योगांसाठी 'एक्झिट सपोर्ट योजना' जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: औद्योगिक वसाहतींमध्ये विनावापर पडून असलेले ४२३ भूखंड नव्या गुंतवणूकदारांकडे हस्तांतरित केले जातील. सरकारने आजारी उद्योगांसाठी 'एक्झिट सपोर्ट योजना' जाहीर केली असून, यातून पडून असलेली तब्बल १२ लाख ७५ हजार चौरस मीटर जमीन वापरात आणली जाईल.

उद्योजकांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल व इतर अधिकारी उपस्थित होते. आजच्या बैठकीत भाग घेतलेल्या उद्योजकांमध्ये व चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्रीनिवास धेपे तसेच इतर उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता.

मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये बऱ्याच वर्षापासून भूखंड विनावापर आहेत. काही जणांनी कारखान्यांसाठी वापरात नाही. काही उद्योजकांनी अर्धवट बांधकाम करून ठेवलेले आहे. या सर्व जणांना आता अखेरची एकदा संधी दिली जाईल. त्यानंतर सरकार हे सर्व भूखंड नव्या उद्योजकांसाठी पोर्टलवर जाहीर करील व ते हस्तांतरित केले जातील. उद्योजकांनी पूर्वी ज्या दराने भूखंड खरेदी केले होते तो दर न देता नवीन दर त्यांना दिला जाईल.

दरम्यान, एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, औद्योगिक विकास महामंडळ एकेकाळी ७५ कोटी रुपये तोट्यात होते. आज महामंडळाकडे २०० कोटी रुपयांहून अधिक निधी आहे. सेझ जमिनींचा लिलाव सुरूच आहे.

उद्योग चालावेत यासाठी सरकारने त्यांना वीज सवलत तसेच अन्य बऱ्याच सवलती दिलेल्या आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये वीजपु रवठा सुधारण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे कामही सुरू आहे. सर्वेक्षणात सध्या ४२३ उद्योगआम्हाला असे आढळून आलेले आहेत. ही संख्या आणखीही जास्त असेल, जे बंद उद्योग आहेत किंवा विनावापर ठेवलेली जमीन आहे ती आता नव्या उद्योजकांकडे हस्तांतरित केली जाईल, जेणेकरून राज्यात नोकऱ्याही निर्माण होतील आणि रोजगाराची संधीही मिळेल, असेही ते म्हणाले.

चार प्रकारांत वर्गीकरण

जीआयडीसीने भूखंडांचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. ज्यामध्ये कोणतेही बांधकाम नाही, अर्धवट बांधकाम असलेले भूखंड, बांधकाम पूर्ण झाले असले तरी उत्पादन होत नसलेले भूखंड आणि कामकाज बंद केलेले उद्योग आदींचा समावेश आहे. या योजनेमुळे आता विनावापर असलेल्या भूखंडांचे वाटप उद्योजकांना करणे सुलभ होईल. सरकारने आजारी युनिट्‌ससाठी हस्तांतरण शुल्क माफ केले आहे, जेणेकरून ते त्यांना भाड्याने दिलेली जमीन हस्तांतरित करू शकतील.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत