शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील 4 हजार विद्यार्थ्यांना मिळणार नोबेल विजेत्यांशी थेट संवादाची अपूर्व संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 14:44 IST

गोव्यातील सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यात नोबेल विजेत्या मान्यवरांशी संवाद साधण्याची अपूर्व संधी प्राप्त होणार आहे. 

पणजी : गोव्यातील सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यात नोबेल विजेत्या मान्यवरांशी संवाद साधण्याची अपूर्व संधी प्राप्त होणार आहे. गोवा सरकार आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैवविविधता विभाग यांच्यात शुक्रवारी महत्त्वपूर्ण  करार झाला. या करारांतर्गत हे वेगळे उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून फेब्रुवारी 3 फेब्रुवारी कार्यक्रम जाणार आहेत.

2 फेब्रुवारी रोजी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील नोबेल विजेत्यांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे प्रत्येक विद्यालयातील 9 विद्यार्थी तर अकरावी आणि बारावी उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी 14 विद्यार्थी थेट संवादाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जातील. विद्यार्थ्यांची त्या-त्या क्षेत्रातील त्यांची कार्यक्षमता तपासूनच निवड केली जाईल.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी करार झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  राज्यातील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले . विज्ञानावर आधारित असे विशेष प्रदर्शन फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत राज्यात भरविण्यात येणार असून विद्यार्थ्याने या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवविविधता विभागातर्फे उपस्थित विजय राव म्हणाले की, या उपक्रमासाठी गोवा सरकारने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लहान राज्यात असले तरी गोव्यासमोर अनेक आव्हाने आहेत. येथील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री पर्रीकर करीत असलेल्या प्रयत्नांची वाखाणणी करून राव म्हणाले की, केवळ तंत्रज्ञानच महत्त्वाचे नसून विज्ञानाची तेवढीच गरज आहे . लोकांनी बदल स्वीकारायला हवेत. या क्षेत्रातील नोबेल विजेत्यांचा गट आमच्याकडे उपलब्ध आहे. स्वीडनचे येथे भरणार असलेले प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे . नोबेल मीडियाचे कार्यकारी अधिकारी म्हणाले की, गोव्यासारख्या विकसित राज्याला हा उपक्रम फार उपयुक्त ठरणार आहे. राज्याचे वित्त सचिव दौलतराव हवालदार यावेळी उपस्थित होते

 

टॅग्स :goaगोवाNobel Prizeनोबेल पुरस्कार