शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

कोरोनाग्रस्तांमध्ये 38 टपाल, कदंब व आरोग्य कर्मचारी, नवी माहिती सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 19:01 IST

पणजी : गोव्यातील एकूण कोरोनाग्रस्तांमध्ये टपाल खात्याचे चार कर्मचारी आहेत. तसेच कदंब वाहतूक महामंडळाचे चालक व अन्य मिळून चार ...

पणजी : गोव्यातील एकूण कोरोनाग्रस्तांमध्ये टपाल खात्याचे चार कर्मचारी आहेत. तसेच कदंब वाहतूक महामंडळाचे चालक व अन्य मिळून चार कर्मचारी आहेत. या शिवाय 19 आरोग्य खात्याचे कर्मचारी व अकरा त्या कर्मचा:यांचे कुटूंबिय आहेत. अशा प्रकारे 38 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर आकडेवारी दिली. इस्पितळात असलेले व उपचारानंतर बरे झालेले असे मिळून गोव्यात आतार्पयत एकूण 359 कोरोना रुग्ण आढळले. यापैकी 67 व्यक्ती उपचारानंतर ब:या झाल्या. त्यामुळे इस्पितळात आता 292 व्यक्ती आहेत. यापैकी दीडशे व्यक्ती तरी येत्या सात ते दहा दिवसांत ठीक होतील व घरी जातील. फक्त वीस व्यक्तींना रुग्ण म्हणता येते. कारण त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते देखील ठीक होतील. गोव्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. गोव्याचा मृत्यू दर हा शून्य आहे. राष्ट्रीय स्तरावर मृत्यू दर 2.7 आहे. एक किडणी रुग्ण व एक कॅन्सर रुग्णही कोविद इस्पितळात आहे. तेही कोरोनामुक्त होतील. त्यांच्यावरील कोरोनाविरोधी उपचार यशस्वी होतील. कॅन्सर किंवा किडणीसाठी ते त्यांचे अन्य उपचार बाहेर घेतील पण कोविद इस्पितळात त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.एखाद्या गावात आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले म्हणून लोकांनी त्यांचा द्वेष करू नये. लोकांनी पाठींबा देण्याची गरज आहे. ते समाजाच्या हितासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करतात. अशा प्रकारचे काम करताना त्यांना कोरोनाची लागण झाली. या कर्मचा:यांबाबत लोकांनी अभिमान ठेवायला हवा. ते काम करताना कोरोनाग्रस्त झाले. लोकांनी भीती पसरवू नये. जिथे कोरोनाग्रस्त व्यक्ती किंवा कर्मचारी सापडला, त्या गावात फैलाव होऊ नये म्हणून आम्ही सगळी काळजी घेत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वेर्णाला नवे कोविड सेंटर शिरोडा येथे जसे कोविड काळजी केंद्र सुरू केले गेले, तसेच एक मोठे केंद्र वेर्णा येथे सुरू होणार आहे. तिथे हॉस्टेल तथा कोविड केंद्र हे 22क् खाटांचे असेल. मडगावचे कोविड इस्पितळ दोनशे वीस खाटांचे आहे. शिरोडा, मडगाव व वेर्णा मिळून खाटांची एकूण संख्या 678 होणार आहे. गोव्यात एकाही रुग्णाला वेंटीलेटरवर ठेवावे लागले नाही. दोघांना ऑक्सीजन पुरवावा लागला होता. तेही ठीक झाले. मांगोरहीलमध्ये पाचशे कुटूंबांना सरकारने रेशन पोहचविले, काहीजणांनी तांदूळ फेकून दिले. हे तांदूळ खराब दर्जाचे नव्हते. सोन्याचे तांदूळ काही कुणी देऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.108 कोरोनाग्रस्त बाहेरून आले मांगोरहीलमध्ये एकूण 194 कोरोना रुग्ण आढळले. ते मांगोरहीलचेच आहेत. मांगोरहीलशी संबंध आलेल्या व्यक्तींमध्ये एकूण 57 कोरोनाग्रस्त आढळले. 108 व्यक्ती अशा आहेत, ज्या कोरोनाग्रस्त असल्या तरी, त्या गोव्याबाहेरून गोव्यात आल्या पण त्यातील फक्त तिघे वगळता अन्य 105 जण हे गोमंतकीयच आहेत. गोव्यात त्यांचे घर आहे. या तिघांमध्ये दोघे वाहन चालक आहेत. मांगोरहील, बायणा, शांतीनगर-वास्को, सत्तरी, सांगे, आडपई- फोंडा अशा ठिकाणी काही कोरोनाग्रस्त व्यक्तींची घरे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या