शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात नोव्हेंबरच्या 4 पासून  36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, IOAचे राज्य ऑलिम्पिक असोसिएशनला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 12:36 IST

राज्यात होणा-या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तारीख भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) जाहीर केली असून, ही स्पर्धा 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे.

विलास ओहाळ/पणजी : राज्यात होणा-या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तारीख भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) जाहीर केली असून, ही स्पर्धा 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. तसे पत्र राष्ट्रीय क्रीडा परिषद आणि राज्य ऑलिम्पिक असोसिएशन यांना पाठविले आहे. राज्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी गेली चार-पाच वर्षापासून वेगवेगळे तर्क जाहीर केले गेले. त्याचबरोबर 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राज्य सरकारने ऑलिम्पिक असोसिएशनला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर राज्य सरकारला या क्रीडा स्पर्धेच्या धरसोडवृत्तीमुळे कोटय़वधी रुपयांचा दंडही सोसावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात आयोजित करणे हे राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालो होता. 

गोव्यात पहिल्यांदाच झालेल्या ल्युसोफोनिया क्रीडा स्पर्धासाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधांमुळे राज्य सरकारला अधिकतर नव्याने काही मोजक्याच सेवा सुविधा निर्माण कराव्या लागणार होत्या. गोव्यात स्पर्धा होणार असल्याने यापूर्वीच राज्य सरकारचे क्रीडा संचालनालय कामाला लागले आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यात विविध खेळांसाठी लागणा-या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आता क्रीडा स्पर्धांना आठ महिन्यांचा कालावधी उरला आहे. 

या स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्याने सरकारला पावसाळ्य़ानंतर केवळ दोन महिने मिळणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्य़ातील मार्चपासून जूनपर्यतच्या कालावधीत जी आवश्यक कामे आहेत, ती पूर्ण करावी लागणार आहेत, तर पावसाळ्य़ानंतरच्या साठ दिवसांत काही कामे करता येणार आहेत. या कामांसाठी राज्य सरकारने सुमारे 230 कोटींच्या निधींची तरतूद या वर्षीच्या अंदाजपत्रात केलेली आहे. राज्य क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याचे संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांनीही यापूर्वीच राज्य राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तयार असल्याचे सूतोवाच दिले होते

टॅग्स :goaगोवाSportsक्रीडा