शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनोकडून सरकारचा ३५० कोटी  महसूल थकविला; मालमत्ता जप्त करून वसुली करणार - मुख्यमंत्री

By वासुदेव.पागी | Updated: July 30, 2024 15:04 IST

राज्यात विविध ठिकाणचे जमिनीवरील कसिनोंकडून सरकारला फार मोठा महसूल येणे बाकी असल्याचे विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे आढळून आले आहे

पणजीः राज्यात विविध ठिकाणी असलेल्या मोठ्या हॉटेलच्या जमिनवरील कॅसिनोकडून राज्यसरकारला एकूण ३४९.८९ कोटी रुपये महसूल थकबाकी असल्याची माहिती विधानसभेत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याकडून देण्यात आली. एका वर्षाच्या आत या कॅसिनोंची मालमत्ता जप्त करून महसूल थकबाकी फेडून घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले. 

राज्यात विविध ठिकाणचे जमिनीवरील कसिनोंकडून सरकारला फार मोठा महसूल येणे बाकी असल्याचे विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नामुळे आढळून आले आहे. कॅसिनोकडून येणे असलेल्या महसूल थकबाकीचे काय करणार?  वसुलीच्या बाबतीत सरकारने काय केले आहे असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला होता. या कॅसिनोच्या मालमत्ता जप्त करून थकबाकीची रक्कम फेडून घेतली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

या कॅसिनोची थकबाकी असतानाही त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण का करण्यात आले असा प्रश्न सरदेसाई यांनी विचारला असता मागील पाच वर्षात एकाही कॅसिनोच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

कोविड संपला तरी महसूल नाहीकोविड महामारीचे निमित्त सांगून काही कॅसिनोंकडून कॅसिनो शुल्कात सवलत मागितली होती. अनेक कॅसिनोकडून येणारा  महसूल कोविड काळापासून थकलेला आहे. तीन कँसिनोंचा तर कोविडच्यापूर्वीपासून म्हणजेच २०१८ पासूनही थकलेला आहे. आता कोविड गेला तरी थकबाकी फेडण्यात आलेली नाही. 

कॅसिनो                                          थकबाकीला केलिप्सो हॉटेल्स.                   ८७.११ कोटीट्रेड विंग्स हॉटेल्स लि.                 ८२.७० कोटीएमकेएम गरँड गेमिंग एन्ट.                ८०.०० कोटीब्रिटो एम्युजमेंट प्रा. लि                १५.५३ कोटीराफाईल्स स्कवेअर डे. प्रा लि.            १०.०० कोटीगोवन हॉटेल्स अँड रिअलिटी प्रा लि.            ३३.२५ कोटीगोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रा लि.             ३०.०० कोटीबिग बी लेश्युर एलएलपी                ११.०० कोटीएकूण थकबाकी                    ३४९.९८ कोटी

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंत