शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात डिसेंबरमध्ये कोविडचे ३३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 14:22 IST

अलिकडे रोज दोन किंवा तीन रुग्णांचे कोविडमुळे निधन होऊ लागले आहे.

पणजी : डिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. कोविड रुग्ण संख्याही झेडपी निवडणुकीनंतर वाढत असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात गेल्या २०-२१ दिवसांत कोविडमुळे ३३ रुग्णांचा जीव गेला आहे.

दि. ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड बळींची संख्या ६८८ होती. त्यावेळी राज्यात १ हजार ३३५ सक्रिय रुग्ण होते. दि. २९ नोव्हेंबरपर्यंत ६८७ बळी होते. त्यावेळी सक्रिय रुग्ण संख्या १३२७ होती. आता सक्रिय रुग्ण संख्या ९७२ आहे. एकूण बळींचे प्रमाण ७२१ झाले आहे.अलिकडे रोज दोन किंवा तीन रुग्णांचे कोविडमुळे निधन होऊ लागले आहे. यात बहुतांश ज्येष्ठ नागरिकच आढळून येत आहेत. विविध व्याधींनी त्रस्त असलेले ज्येष्ठ नागरिक कोविड झाल्यानंतर मरण पावतात असा अनुभव डिसेंबरमध्येही आला. 

सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये कोविडमुळे जेवढे बळी गेले, त्या तुलनेत डिसेंबरमध्ये बळींचे प्रमाण डिसेंबरमध्ये कमी आहे. डिसेंबरमध्ये तीन-चारवेळा दिवस असे आले की, तेव्हा चोवीस तासांत कोविडमुळे कुणीच दगावला नाही. सध्या प्रत्येक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात पूर्वीच्या तुलनेत आता कोविडग्रस्तांची संख्या कमी दिसते. पूर्वी प्रत्येक छोट्या शहरातील व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात खूप कोविडग्रस्त होते. प्रत्येक ठिकाणी पन्नासहून अधिक कोविडग्रस्त होते. आता हे प्रमाण वीस- पंचावीसवर आले आहे.

डिचोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात आता १३ कोविडग्रस्त आहेत. साखळीत १८ तर वाळपईच्या क्षेत्रात फक्त ८ कोविडग्रस्त आहेत. म्हापसा व पणजीच्या क्षेत्रातही कोविडग्रस्तांची संख्या कमी झाली आहे. म्हापशात आता १५ तर पणजीत ५९ कोविड रुग्ण आहेत. खोर्लीला १७ तर शिवोलीला २५ कोविड रुग्ण आहेत. कोलवाळला संख्या १५ तर चिंबलला संख्या ३८ पर्यंत खाली आली आहे. 

सांगेमध्ये २३ तर शिरोडा येथे १२ व बाळ्ळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात आता संख्या १९ आहे. कुडचडे आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ३३ तर मडकई आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात कोविड रुग्णांची संख्या १० झाली आहे.

जिल्हा पंचायत निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वी संख्या खूप कमी होती. आता चाचण्यांच्या तुलनेत कोविड पॉझिटीव रुग्णांची संख्या वाढतेय. टीपीआर ९.१ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे रविवारी स्पष्ट झाले. येत्या आठवड्यात हे प्रमाण ८ ते ११ टक्के असे देखील राहू शकते, असे जाणकारांना वाटते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या