शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आमदार सैलकडून ३०० कोटीचे खनिज निर्यात, एसआयटीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 21:58 IST

गोव्यातील खाण घोटाळ प्रकरणात सहभाग आढळून आलेले कारवारचे आमदार सतीश सैल यांच्या मल्लिकार्जून शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडने गोव्यातील ३०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या खनिज मालाची निर्यात केल्याचे एसआयटीला तपासातून आढळून आले आहे. एसआयटीकडून सैल यांना समवन्स बजावून २ तास चौकशी केली होती. 

पणजी - गोव्यातील खाण घोटाळ प्रकरणात सहभाग आढळून आलेले कारवारचे आमदार सतीश सैल यांच्या मल्लिकार्जून शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडने गोव्यातील ३०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या खनिज मालाची निर्यात केल्याचे एसआयटीला तपासातून आढळून आले आहे. एसआयटीकडून सैल यांना समवन्स बजावून २ तास चौकशी केली होती. सैल यांचा खाण घोटाळ््याशी प्रत्यक्ष स हभाग असल्याची माहीती  एसआयटीला मिळाल्यानंतर त्यांची चौकशी एसआयटीने सुरू केली होती. त्यात सैल यांची गोव्यातही मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. तसेच उत्तर गोव्यात त्याचा एक भुखंड असून त्यावर खनिज माल साठवून ठेवला जातो. गोव्यातील अनेक ट्रेडरशी त्याचा संबंध होता. मुख्य म्हणजे कायदेशीर आणि बेकायदेशीर ट्रेडरकडूनही त्यांनी खनिज माल नेला आहे. एसआयटीने काही ट्रेडरना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून ही माहिती एसआयटीला मिळाली. गोव्यातून बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात आलेला लोहखनीज हा ट्रेडर्सद्वारे या कंपनीला पुरविला जात होता. या कंपनीकडून त्याची नंतर निर्यात केली जात होती. खाण घोटाळ््यातील संशयित ट्रेडरच्या नोंदवहीत मल्लिकार्जून शिपिंगचा उल्लेख आढळला आहे. एसआयटीने समन्स बजावल्यानंतर पहिल्या समन्सला सैल एसआयटीपुढे उपस्थित राहिले नव्हते. परंतु दुस-या समन्सला ते उपस्थित राहिले. परंतु त्यापूर्वी पणजी सत्र न्यायालयाकडून अंतरीम अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतरच ते एसआयटीच्या कार्यालयात गेले. अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी ही खबरदारी घेतली होती.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या