शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नगरविकाससाठी दिले ६ महिन्यात २६६ कोटी; फ्रांसिस्क डिसोजाच्या आरोपांचे मुख्यंत्र्यांकडून खंडन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 23:19 IST

फ्रान्सिस्क डिसोझा यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या पालिका आणि जीसुडासाठी सरकारडून ७ महिन्यात २६६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच मागील वर्षांच्या तुलनेत निधीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन दिली.

पणजी: फ्रान्सिस्क डिसोझा यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या पालिका आणि जीसुडासाठी सरकारडून ७ महिन्यात २६६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच मागील वर्षांच्या तुलनेत निधीत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन दिली. डिसोझा यांनी निधी मिळत नसल्यामुळे जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्या पार्श्वभूमीवर त्यांच्या खात्यांना देण्यात आलेल्या निधीची माहिती देऊन आरोपांचे अप्रत्यक्षरित्या खंडन केले आहे. 

जीसुडाच्या  सात महिन्यात खर्च केलेल्या ३३ कोटी रुपयांपैकी १५ कोटी रुपये हे केवळ म्हापशात खर्च करण्यात आले. पालिकांसाठी देण्यात आलेला खर्च या वर्षाअखेरीस ४०० कोटीवर पोहोचणार आहे.  जीसूडा आणि पालिकांसाठी देण्यात येणाºया निधीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत  म्हणजेच ६ महिन्यात सरकारकडून १३०० कोटी रुपये, म्हणजेच एकूण अर्थसंकल्पाच्या ४० टक्के खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींचा ९० टक्के खर्च केला जाईल. भांडवली खर्चाच्या बाबतीत तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याचीही पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी आणि प्रत्यक्ष सरकारच्या प्रत्येक खात्याकडून करण्यात आलेला खर्च याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. पहिल्या सहा महिन्यात सरकारकडून विविध विकास कामांवर करण्यात आलेला प्रत्यक्ष खर्च हा समाधानकारक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ३० सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेल्या १३०० कोटी रुपयांच्या  खर्चात पायाभूत साधन सुविधा,सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, कृषी, क्रीडा, आरोग्य आणि इतर सर्व क्षेत्रात करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील खर्चाचा समावेश आहे. सर्वाधीक प्रमाण हे साधन सुविधा उभारण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. पहिल्या ६ महिन्यात एकूण अर्थसंकल्पाच्या २६ ते २८ टक्के खर्च केला जात असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. यावर्षी पहिल्यांदाच तो ४० टक्क्यावर गेला आहे. सर्व खात्यांकडून चांगले काम करण्यात आल्यामुळेच हा मोठा टप्पा ओलांडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एकूण खर्चाच्या बाबतीतही ९० टक्क्यापर्यंत मजल जाणार असल्याचे ते म्हणाले. नगरविकास मंत्री फ्रांसिस्क डिसोजा यांनी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या वित्तखात्याकडून निधी मंजूर केला जात नसल्याचा आरोप करून नाराजी व्यक्त केली होती, आणि या पार्श्वभूमीवर खर्चाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर