शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात 20 टक्के डीलर्स जीएसटी भरण्याचे टाळतात,वाणिज्य कर खात्याकडून नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 14:01 IST

गोव्यातील २0 टक्के डीलर्स जीएसटी भरण्याचे टाळत असल्याचे येथील वाणिज्य कर खात्याला आढळून आले असून वसुलीच्या बाबतीत या डीलर्सवर कडक कारवाई केली जाणार आहे. 

पणजी : गोव्यातील २0 टक्के डीलर्स जीएसटी भरण्याचे टाळत असल्याचे येथील वाणिज्य कर खात्याला आढळून आले असून वसुलीच्या बाबतीत या डीलर्सवर कडक कारवाई केली जाणार आहे.  जीएसटी भरण्यास टाळाटाळ करणा-यांमध्ये लहान व्यापा-यांचाच भरणा असल्याचे वाणिज्य कर आयुक्त दीपक बांदेकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, जीएसटीसाठी विवरणपत्रे भरण्यास टाळाटाळ करणा-या डीलर्सकडून महिना १८ टक्के व्याज लावून वसुली केली जाते. आजच्या घडीला राज्यात सुमारे २८ हजार डीलर्सनी जीएसटीसाठी नोंदणी केली असून सुमारे ५ हजार डीलर्स जीएसटी भरण्याचे टाळत आहेत. जे कोणी जीएसटी विवरणपत्रे भरण्यास विलंब करीत आहेत त्यांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. 

गेल्या वर्षी जुलैमध्ये जीएसटी लागू झाला तेव्हा जुलै-आॅगस्ट  पहिल्याच महिन्यात ६८ कोटी रुपये, सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये ३५ कोटी रुपये मिळाले.  दरम्यान, जीएसटीच्या बाबतीत पहिले काही महिने सौम्य धोरण स्वीकारल्यानंतर वाणिज्य कर खात्याने आता कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. ३ ब विवरणपत्रे न भरलेल्या सुमारे ५ हजार डीलर्सना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी १ जुलैपासून देशातील उर्वरित राज्यांबरोबरच गोव्यातही जीएसटी लागू झालेला आहे. दर महिन्याच्या २0 तारीखपर्यंत ३ ब विवरणपत्र सादर करणे व्यापारी, डीलर्स यांना बंधनकारक आहे. परंतु अनेक डीलर्सनी अशी विवरणपत्रे भरलेलीच नाहीत. 

बांदेकर म्हणाले की, सुरवातीचे तीन महिने खात्याने मवाळ धोरण स्वीकारले होते. परंतु आता अंमलबजावणी सुरु होऊन वर्ष उलटलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपली उलाढाल स्पष्ट करणे आवश्यक आहे. ३ ब विवरणपत्र न भरल्यास विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी दंडाची तरतूद आहे. डीलर्सकडून हा दंड वसूल करुन घेतला जाईल. 

प्राप्त माहितीनुसार राज्यात सुमारे २८ हजार डीलर्स आहेत. जीएसटीसाठी अंदाजे ७५ टक्के डीलर्सनी नोंदणी केली असून अनेकांनी कंपोझिशन योजनेचा लाभ घेतलेला आहे.   जीएसटीच्या बाबतीत व्यापारी, व्यावसायिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याकरिता सरकारने तालुकावार पाच ठिकाणी चार्टर्ड अकाऊंन्टट्सची मोफत सेवा दिली होती तरीही काही डीलर्सनी त्याकडे दुर्लक्ष केले. जीएसटी भरण्यास टाळाटाळ करणा-या डीलर्सवर आता कडक कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :GSTजीएसटीgoaगोवा