शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खासगी विद्यालयात शारिरीक शिक्षणाच्या शिक्षकाकडूनच २ विद्यार्थिनीचा विनयभंग

By आप्पा बुवा | Updated: August 28, 2023 20:23 IST

आर जे पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीने आरोपी शिक्षकाविरुद्ध शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

फोंडा - फोंडा तालुक्यात एका खासगी विद्यालयात शारीरिक शिक्षकाने शाळेतील दोन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडल्यामुळे खळबळ माजली आहे. मुख्य म्हणजे सदरची घटना एक महिन्यापूर्वी घडली होती परंतु शाळा व्यवस्थापनाने यासंदर्भात कोणतीच तक्रार न दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोमवारी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सदर गुन्ह्याला वाचा फोडली व म्हार्दोळ पोलिस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली आहे.

आर जे पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीने आरोपी शिक्षकाविरुद्ध शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. तक्रार देऊनही सदर शिक्षकावर कोणतेच कारवाही होत नाही ते पाहून पीडित मुलगी  प्रचंड मानसिक आघातातून जात होती. परिणामी तिने शाळेत जाणे बंद केले. त्याच शाळेत तिची धाकटी बहीण सुद्धा जाते. सदर घटनेची धास्ती घेऊन तिने सुद्धा नंतर शाळेत जाणे बंद केले.

आरजी पक्षाचा पाठिंबा मिळताच सदर मुलीच्या पालकांनी पोलीस स्थानकात सोमवारी रीतसर तक्रार दाखल केली आहे. मुख्य म्हणजे एवढे सगळे होऊनही सदर शिक्षक अजूनही शाळेत शिकवत आहे. असे आरजीपी नेते विश्वेश नाईक यांनी सांगितले.

सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देते, पण प्रत्यक्षात लहान मुलीवर अत्याचार होत असताना सरकार काहीही करत नाही. सदर शिक्षकावर योग्य ती कारवाई न झाल्यास शाळेवर मोर्चा नेऊ, असा इशारा विश्वेस नाईक यांनी दिला आहे. रेवोल्युशनरी गव्हर्नन्स पक्षाचे नेते म्हणतात त्याप्रमाणे परीक्षेच्या दिवसात सदर मुलगी मागच्या बाकावर बसून पेपर सोडवत होती. नेमके त्याचवेळी सदर शिक्षकाने सदर मुलीचा विनयभंग केला. सदरची बाब त्या मुलीने अन्य एका शिक्षिकेला सांगितली पण एक महिना झाले तरी अजून काहीही झाले नाही.

आर जी पक्षाचे नेते विश्वेश नाईक, प्रेमानंद नाईक, शैलेश नाईक यांच्यासह स्थानिकांनी सोमवारी पोलीस स्थानकात मोठी गर्दी केली.पीडितेला न्याय मिळेपर्यंत  हा लढा लढणार असल्याचा इशारा आरजी नेत्यानी पोलिसांना दिला आहे.