शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक प्रवेश आणि अन्य सवलतींसाठी १५ वर्षे निवासाची सक्ती निरुपयोगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 23:05 IST

ज्यांचे आई, वडील गोमंतकीय आहेत, अशा मूळ गोवेकरांनाच राखीवता दिली जावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी केली आहे.

पणजी : गोव्यात सरकारी नोक-या तसेच शैक्षणिक प्रवेश आणि अन्य सवलतींसाठी १५ वर्षे निवासाच्या सक्तीचा परप्रांतीयांना रोखण्यासाठी कोणताही उपयोग होत नसल्याचा दावा करीत गोव्यात जन्मलेले आणि ज्यांचे आई, वडील गोमंतकीय आहेत, अशा मूळ गोवेकरांनाच राखीवता दिली जावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तथा माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी केली आहे. उपसभापती मायकल लोबो यांनी परप्रांतीय गुन्हेगारांना हाताशी धरून व्होट बँक तयार केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.पत्रकार परिषदेत फर्नांडिस यांनी लोबो हे परप्रांतीयांना अभय देत असल्याचा आरोप केला. लोबो यांनी बंजारा समाजाच्या एका व्यक्तीला रेंट ए कार व्यवसायासाठी चारित्र्याचा दाखला दिला. कांदोळी, हडफडे, पर्रा भागातील परप्रांतीय गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यांना लोबो यांच्याकडून अभय मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्रा येथे बंजारा समाजाच्या लोकांची वसाहतच उभी राहिली आहे. हडफडें येथे स्पा, डान्स बार परप्रांतीयांकडून चालविले जातात. परप्रांतीयांनी या ठिकाणी गुन्हेगारी विश्वच निर्माण केले आहे, असे फर्नांडिस म्हणाले. ह्यरेंट ए कारह्णव्यवसायिकांनी ५ वर्षे न्यायालयीन लढा देऊन न्याय मिळविला. सरकारने पाच वर्षे त्यांच्या व्यवसायाचे नुकसान केले, असा आरोपही त्यांनी केला.ह्यमूळ गोंयकारांना आरक्षण द्याह्णते पुढे म्हणाले की, ह्यराज्यात परप्रांतीयांची संख्या एवढी वाढली आहे की, पुढील ५0 वर्षात गोमंतकीय नावालाही मिळणार नाहीत. महाराष्ट्रात सरकारने मराठ्यांना जसे आरक्षण दिले तसे मूळ गोंयकारांना नोकºया, शिक्षण तसेच अन्य बाबतीत आरक्षण द्यावे लागेल.दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या बूथ कार्यकर्ता सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या, अशी टीका त्यांनी केली.