शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद; रस्ते, बाजारपेठ, किनाऱ्यांसह धार्मिक स्थळांवरही शुकशुकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 13:00 IST

अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेने आज हॉटेल्स बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हॉटेलेही बंद राहिली. पेट्रोल पंप बंद आहेत.

पणजी :  गोव्यात जनता कर्फ्यूला लोकांचा १०० टक्के प्रतिसाद लाभला. सर्व रस्ते निर्मनुष्य बनले असून बाजारपेठा ओस पडल्या आहेत. बसेस बंद आहेत, रस्त्यावर केवळ पोलीसच दिसत आहेत. किनारे, धार्मिक स्थळेही निर्मनुष्य बनली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून गोव्यातील जनतेने सजगता दाखवत उस्फूर्तपणे घरातच राहणे पसंत केले. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. राजधानी  शहरातील रस्ते सुने सुने झाले होते.  सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. मासळी मार्केट बंद आहे. भाजी बाजारही बंदच राहिला.

अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेने आज हॉटेल्स बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हॉटेलेही बंद राहिली. पेट्रोल पंप बंद आहेत. रस्त्यावर एकही वाहन दिसत नाही. कदंब महामंडळाने मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच बेळगाव, मुंबईकडे जाणाऱ्या आंतरराज्य बसगाड्या कालपासूनच बंद केल्या आहेत. शेजारी राज्यांमधून बस गाड्याही गोव्यात येत नाहीत. वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. लोकांनी घरीच टीव्हीवर बातम्या पाहणे पसंत केले.

आजच्या कर्फ्यूला राज्यातील सर्व राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला होता. लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले होते. गोवा फॉरवर्ड पक्षाने तर आपले पक्ष कार्यालय पुढील दोन आठवड्यांसाठी बंद केले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकी साठी उघडलेली प्रचार कार्यालयेही विविध उमेदवारांनी गर्दी टाळण्यासाठी बंद केलेली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा