शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लवकरच 100 इलेक्ट्रिक बसगाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 14:17 IST

गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणारे कदंब महामंडळ नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडे समझोता करार करणार असून लवकरच १०० इलेक्ट्रिक बसगाड्या राज्यांतर्गत मार्गांवर धावणार आहेत.

ठळक मुद्देकदंब महामंडळ नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडे समझोता करार करणार असून लवकरच १०० इलेक्ट्रिक बसगाड्या राज्यांतर्गत मार्गांवर धावणार.गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे कामही एनटीपीसी करणार आहे. देशात इलेक्ट्रिक बसगाड्याद्वारे वाहतूक करणारे कदंब  महामंडळ हे पहिले महामंडळ ठरणार आहे

पणजी - गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणारे कदंब महामंडळ नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडे समझोता करार करणार असून लवकरच १०० इलेक्ट्रिक बसगाड्या राज्यांतर्गत मार्गांवर धावणार आहेत. या शंभर बसगाड्या एनटीपीसी पुरवणार आहे. गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे कामही एनटीपीसी करणार आहे. देशात इलेक्ट्रिक बसगाड्याद्वारे वाहतूक करणारे कदंब  महामंडळ हे पहिले महामंडळ ठरणार आहे, असा दावाही केला जात आहे.

बसगाड्या तसेच दुचाकी किंवा चारचाकी वाहनांना इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी सोय करण्याचीही तरतूद आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यासारख्या आघाडीच्या पेट्रोलियम कंपन्यानाही या कामात सामावून घेतले जाणार आहे. या परस्पर समझोता करारासाठीची फाईल सरकारी मंजुरीसाठी गेलेली आहे. जून २०१९पर्यंत ही व्यवस्था करण्याची योजना आहे. करारावर सह्या झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. पंचवीस ते तीस बसगाड्या एका टप्प्यात याप्रमाणे चार वेळा टप्प्यात मिळून वर्षभरात १०० इलेक्ट्रिक बसगाड्या घेतल्या जातील. यासाठीची संपूर्ण गुंतवणूक एनटीपीसी करणार आहे. कदंब महामंडळ एनटीपीसीला  किलोमीटरमागे ४७ ते ४९ रुपये भाडे देईल. दिवसाकाठी २०० किलोमीटर बस धावणे गरजेचे आहे. कदंब महामंडळाचा प्रति किलोमीटर तीन ते चार रुपये खर्च वाचेल,  असा दावा केला जातो. एका बसवर कदंबचे वर्षाकाठी तीन लाख रुपये वाचतील. या इलेक्ट्रिक बसगाड्या एकदा चार्ज केल्यानंतर १२० किलोमीटरपर्यंत धावतील.

टॅग्स :goaगोवा