शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांची चोरी २४ तासात पकडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 20:49 IST

उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेल्या चोरीच्या प्रकारा संबंधी सालचेंभाट-रेवोडा येथील विनोद लोकरे यांनी तक्रार दाखल केली होती.

म्हापसा : बार्देश तालुक्यातील रेवोडा येथील एका घरफोडीचा छडा कोलवाळ पोलिसांनी २४ तासात लावून घरातून चोरलेले १० लाख रुपये किमतीचे  दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. या प्रकरणात सुधीर सिंग ( २३ वय, रा. रेवोडा, मूळ उत्तर प्रदेश) या संशयिताला अटक केली आहे.

उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेल्या चोरीच्या प्रकारा संबंधी सालचेंभाट-रेवोडा येथील विनोद लोकरे यांनी तक्रार दाखल केली होती.  केलेल्या तक्रारीत चोरीचा प्रकार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११ च्या दरम्यान घडल्याचे नमुद केले होते. संशयिताने घराचा मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला होता. आत प्रवेश केल्यावर घरातील कपाटात ठेवण्यात आलेले १९६ ग्राम वजनाचे १० लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. यात मंगळसूत्र, अंगठी, बांगड्या यांचा समावेश होता. तसेच त्या सोबत कपाटातील दिड हजार रुपयेनकदही चोरण्यात आले होते.  केलेल्या तक्रारीनंतर कोलवाळ स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रोहन मडगांवकर,  महिला उपनिरीक्षक सोनम वेरेकर तसेच इतरांनी रेवोडा परिसरातील मुख्य रस्त्या सिल करुन तपास कार्य आरंभले. तसेच स्थलांतरीत कामगार रहात असलेल्या रेवोडा परिसरातील तपासणी पोलिसांकडून हाती घेण्यात आली.

या दरम्यान संशयित सुधीर सिंग याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूलही केला. त्याला अटक करून नंतर त्याच्या विरोधात भा. द. सं च्या कलम ४५४ तसेच ३८० खाली गुन्हा दाखल करण्यात आला. चोरलेले सर्व दागीने पोलिसांनी नंतर संशयिताकडून पंचनामा करून ताब्यात घेतले. पुढील तपास कार्य उपनिरीक्षक सोनम वेरेकर यांच्या मार्फत सुरु आहे.