लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयापासून दीड किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी येथील जि. प. शाळेच्या इमारतीचे छत वादळी पावसाने पूर्णत: कोसळले. सदर घटना ही मंगळवारी सकाळी ९ वाजता घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.सकाळी १० वाजता विद्यार्थ शाळेत येतात, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या इमारतीत वर्ग भरत नाहीत. परंतु दुपारचे शालेय पोषण आहार येथे घेतले जात होते. मागील चार वर्षांपूर्वी ५० हजार रुपये खर्च करुन या इमारती दुरूस्ती करण्यात आली होती. अल्पवधीतच ही इमारत कोसळली. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इमारतीच्या भींतीना सर्वत्र भेगा पडल्या आहेत. दुरुस्तीमध्ये छतावरील काम बरोबर न केल्यानेच ही इमारत कोसळली अशी चर्चा सुरु आहे. शाळा इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अहेरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी निर्मला वैद्य व गटसमन्वयक ताराचंद भुरसे यांनी तातडीने शाळेला भेट देवून पाहणी केली व इमारत निर्लेखनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला तत्काळ पाठविण्याच्या सूचना मुख्याध्यापिका शालीनी चलकमवार यांना दिल्या. यावेळी शिक्षक संजय कोमकुंटीवार व पालक उपस्थित होते.
जि.प. शाळेचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:21 IST
तालुका मुख्यालयापासून दीड किमी अंतरावर असलेल्या गडअहेरी येथील जि. प. शाळेच्या इमारतीचे छत वादळी पावसाने पूर्णत: कोसळले.
जि.प. शाळेचे छत कोसळले
ठळक मुद्देगडअहेरीतील घटना : वादळी पावसाचा परिणाम