गडचिरोली : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सीटू संलग्नीत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने आज शुक्रवारी जिल्हा परिषदसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुकारलेल्या देशव्यापी मागणी दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेशचंद्र दहीवडे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, अच्छे दिन आएंगे असे म्हटल्याने सर्वसामान्यांना अच्छे दिन येणार नाहीत. संघटीतरित्या संघर्ष करूनच अंगणवाडी महिलांना अच्छे दिन पाहायला मिळतील. यापुढील आंदोलनासाठी अंगणवाडी महिलांनी संघटीतरित्या एकत्रित यावे, असे आवाहनही रमेशचंद्र दहीवडे यांनी यावेळी केले. याप्रसंगी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात ४५ व्या श्रम संमेलनाच्या शिफारशीची अंमलबजावणी करा, संसदीय शिफारशीची अंमलबजावणी करून अंगणवाडी महिलांना महागाई भत्त्यासह किमान वेतन देण्यात यावे, महागाई नुसार अंगणवाडी सेविकांना ५०० रूपये तर मदतनिसांना ३५० रूपये मानधन वाढ देण्यात यावी, मिनी अंगणवाडीचे रूपांतर अंगणवाडीत करण्यात यावे, अंगणवाडी मदतनिसांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष उज्वला उंदीरवाडे यांनी शासनाच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात ललिता केदार, कुसूम नागोसे, मंदा चव्हाण, वीणाताई चन्नावार, इंदूमती भांडारकर, माया शेडमाके, माया नैनुरवार, ज्योती कोमलवार, कौसल्या गौरकार, नागमनी दासरी, सुमन तोकलवार, आशा कोटांगळे, भारती रामटेके, अरूणा नांदणकर, निशा कामडी, सरीता आत्राम, कार्तिकस्वामी कोवे, सुशिला भगत, डी. एस. वैद्य, विठाबाई भट, ललिता दहागावकर, छाया मोगरे, जाहीरा शेख, लता कडुकर, शालू बुर्रेवार, संगीता वडलाकोंडावार, प्रभा बारेकर, यामिनी झंझाळ उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
जि.प. समोर अंगणवाडी महिलांचे आंदोलन
By admin | Updated: July 12, 2014 01:10 IST