झिंगानूर : सिरोंचा तालुक्याच्या टोकावर दुर्गम भागात वसलेल्या झिंगानूर येथे अनेक समस्यांची भरमार आहे. झिंगानुरातील विद्युत जनित्रात बिघाड झाल्याने मागील २६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागत आहे. मात्र विद्युत जनित्राच्या दुरूस्तीकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. झिंगानूर येथील आंबेडकर चौकातील विद्युत जनित्रात २६ आॅगस्टच्या रात्री बिघाड आला. परिणामी मध्यरात्रीपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला. त्यानंतर ६ ते ७ दिवसांचा कालावधी लोटूनही विद्युत जनित्राची दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे. विद्युत जनित्रामध्ये पाणी शिरल्याने आणखी ८ ते १५ दिवस वीज पुरवठा सुरळीत होणार नाही, असे झिंगानूर येथील एका विद्युत कर्मचाऱ्यांने सांगितल्याची माहिती आहे. सद्य:स्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक जीवजंतूपासून नागरिकांना धोका होऊ शकतो. झिंगानूर परिसर झाडाझुडपांनी युक्त असल्याने जीवजंतूपासून अपाय होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या परिसरातील कोर्ला, रमेशगुडम, क्रिष्टापल्ली, करजेली, येडचिली, लाई आदी गावातील विद्युत पुरवठा मागणी अनेक दिवसांपासून खंडीत आहे. मागील वर्षी या गावांमध्ये वाढीव खांब पोहोचले परंतु वादळवाऱ्याने अनेक विद्युतखांब कोसळून वीज पुरवठा खंडीत झाला. तेव्हापासून अजुनपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही.(वार्ताहर
सहा दिवसांपासून झिंगानूर अंधारात
By admin | Updated: September 1, 2014 23:34 IST