शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
4
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
5
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
6
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
8
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
9
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
10
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
11
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
12
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
13
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
14
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
15
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
16
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
17
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
18
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
19
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
20
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप

युवा महोत्सवाचे बक्षीस वितरण

By admin | Updated: April 27, 2017 01:24 IST

स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात २३ ते २५ एप्रिल दरम्यान आयोजित ओबीसी युवा

कबड्डी, बुद्धिबळ, नृत्य स्पर्धा : तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद गडचिरोली : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात २३ ते २५ एप्रिल दरम्यान आयोजित ओबीसी युवा महोत्सवाचा समारोप मंगळवारी करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, ओबीसी कॅडर कॅम्पचे प्रमुख मार्गदर्शक अभियंता अरविंद माळी, साहित्यिक प्रा. डॉ. बळवंत भोयर , नगरसेवक सतीश विधाते, दादाजी चापले, दादाजी चुधरी, प्रा. शेषराव येलेकर, पांडुरंग घोटेकर, विनायक बांदूरकर, डी. के. उरकुडे, संजय निशाने, डॉ. सुधा सेता, प्राचार्य जी. एम. दिवटे आदी उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमात अनिल म्हशाखेत्री, डॉ. नामदेव उसेंडी, अरविंद माळी, डॉ. बळवंत भोयर, सतीश विधाते, प्राचार्य दिवटे यांनी मार्गदर्शन करीत ओबीसींनी एकजूट होण्याचे आवाहन केले. युवा महोत्सवात कबड्डी, बुद्धिबळ व समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. कबड्डी स्पर्धेसाठी जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून प्रायोजित १५ हजार १ रूपये रोख पारितोषिक व चषक जय गुरूदेव क्रीडा मंडळ नवेगाव क्र. १ यांनी पटकाविला. जि. प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे व नगरसेवक सतीश विधाते यांच्याकडून प्रायोजित १० हजार १ रूपये व चषकाचे द्वितीय पारितोषिक जय गुरूदेव क्रीडा मंडळ नवेगाव क्र. २ यांनी पटकाविला. बुद्धिबळ स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५ हजार १ रूपये व चषक अजय निंबाळकर याने पटकाविले. कल्पतरू बहुउद्देशीय संस्था गडचिरोली यांच्याकडून प्रायोजित द्वितीय पारितोषिक व चषक भाग्यश्री भांडेकर हिने पटकाविले. माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी व कुणाल पेंदोरकर यांनी प्रायोजित केलेले गु्रप डान्स स्पर्धेतील प्रथम पारितोषिक १० हजार १ रूपये रोख व चषक गणराज ग्रुप डान्स सिंदेवाही यांनी पटकाविला. जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर यांच्याकडून प्रायोजित द्वितीय पारितोषिक ७ हजार १ रूपये व चषक डॅचलर ग्रुप डान्स अहेरी यांनी पटकाविले. तिन्ही स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अक्षय ठाकरे तर आभार नयन कुनघाडकर यांनी मानले. समारोपीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओबीसी विद्यार्थी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे, अक्षय ठाकरे, नयन कुनघाडकर, तुषार वैरागडे, राहूल भांडेकर, अतुल वाढई, शुभम बांगरे, चेतन शेंडे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)