शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
4
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
5
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
6
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
7
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
8
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
9
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
10
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
11
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
12
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
13
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
14
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
15
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
16
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
17
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
18
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
19
"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप
20
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

मिळगुळवंचा येथील युवकांना पोलिसांकडून मारहाण

By admin | Updated: May 18, 2016 01:31 IST

कोठी व नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या पोलीस जवानांनी मंगळवारी तालुक्यातील मिळगुळवंचा येथील चार युवकांना

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : कोठी व नारगुंडा पोलिसांवर आरोपगडचिरोली : कोठी व नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या पोलीस जवानांनी मंगळवारी तालुक्यातील मिळगुळवंचा येथील चार युवकांना मारहाण केल्याची तक्रार मिळगुळवंचा येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पोलीस मदत केंद्र कोठी व नारगुंडा येथील पोलीस १६ मे रोजी सकाळी ८ वाजता गावात आले. ढोल वाजवून सर्व गावकऱ्यांना जमा केले व सभा घेतली. १७ मे रोजी सर्व गावकऱ्यांना पोलीस मदत केंद्र कोठी येथे उपस्थित राहण्यास बजाविले. पेका मादी पुंगाटी हा युवक आपल्या शेतात तेंदूची पाने तोडत असताना त्याला मारहाण करून पोलिसांनी कोठी मदत केंद्रात नेले. त्यांच्याबरोबरच गावकरीही पोलीस मदत केंद्रावर पोहोचले. पोलिसांनी पेका मादी पुंगाटी व चुक्कू मादी पुंगाटी याला आतमध्ये नेऊन बेदम मारहाण केली व नंतर किशोर बिका दुर्वा, सरजु पेका पुंगाटी व अमर चैतू नरोटी यांनाही मारहाण करण्यास सुरूवात केली. नक्षलवादी तुमच्या गावात येतात. त्याला तुम्ही जेवन देता, नक्षलवाद्यांचे कपडे घालून मारून टाकू, असे मारहाण करतेवेळी म्हणत होते. मारहाणीमुळे चुक्कू पुंगाटी याची प्रकृती चिंताजनक आहे. तो बोलू शकत नाही. त्यामुळे त्याला उपचारासाठी लोकबिरादरी प्रकल्पात दाखल करण्यात आले आहे. पेका मादी पुंगाटी हा सध्या पोलिसांच्याच ताब्यात आहे. पोलिसांच्या या अत्याचारी प्रवृत्तीमुळे गावकरी दहशतीत आहेत. तेंदूपत्ता हंगाम सुरू झाला असतानाही ते घराबाहेर पडू शकत नाही. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करून शासनाप्रती विश्वासाचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी निवेदनातून झुरू मादी पुंगाटी, सरजू पेका पुंगाटी, ऋषी झुरू पुंगाटी, चैतू पेका नरोटी, अमर चैतू नरोटी, कोपा दसरू दुर्वा, अशोक भिवा दुर्वा, किशोर भिका दुर्वा, राजू कोमटी मट्टामी यांनी केली आहे. मारहाण झालेल्यांमध्ये सरजू पेका पुंगाटी व किशोर पेका दुर्वा हे अकराव्या वर्गात भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा भामरागड येथे शिकत आहे. तर अमर नरोटी हा कोठी येथे शिकत आहे. पेका पुंगाटीचा बंडू वाचामीच्या हत्येत हातनक्षल्यांनी हत्या केलेल्या पोलीस कर्मचारी बंडू वाचामी यांना पेका मादी पुंगाटी याने नक्षल्यांना पकडून दिले आहे. या कामासाठी अजून दोन व्यक्तींनी मदत केली आहे. त्यामुळे पेका मादी पुंगाटी याच्या विरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती भामरागड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक चौधरी यांनी लोकमतला दिली.