शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तरुण उमेदवारांचा रिंगणात बोलबाला

By admin | Updated: October 28, 2015 01:43 IST

विधानसभा, लोकसभा निवडणुकीत स्थानिक स्तरावरील प्रचाराची धुरा सांभाळणारे लोकप्रतिनिधी आता थेट नगर पंचायतीची निवडणूक लढवित आहेत.

भामरागड नगर पंचायत : मतदार नव्या चेहऱ्याच्या शोधात भामरागड : विधानसभा, लोकसभा निवडणुकीत स्थानिक स्तरावरील प्रचाराची धुरा सांभाळणारे लोकप्रतिनिधी आता थेट नगर पंचायतीची निवडणूक लढवित आहेत. अनेक वर्षांपासून राजकारणात राहूनही जनतेची कामे न करता स्वत:भोवती वलय निर्माण करणारे लोकप्रतिनिधी लोकसेवा करण्याची ईच्छा मतदारांजवळ व्यक्त करीत आहेत. गावाचा विकास करण्याचे आश्वासन देऊन घरोघरी हजेरी लावत आहेत. परंतु निवडणुकीनंतर निवडून आलेले बरेच राजकारणी सरड्याप्रमाणे रंग बदलणारे आहेत. याची जाणीव मतदारांना असल्याने पुन्हा अशा उमेदवारांना संधी द्यायची की नाही, हे मतदारांच्या हातात आहे. म्हणून मतदार राजा यावेळी सुशिक्षित व तरूण उमेदवाराला प्राधान्य देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.यापूर्वी निवडणुकीत निवडून आलेले आता पुन्हा उभे ठाकले आहेत. या उमेदवारांनी लोकहितासाठी काय केले, असे मतदार विचारू लागले आहेत. आज अनेक उमेदवार पक्षाच्या निवडणूक चिन्हावर उभे आहेत. त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काय काम केले, हे सुद्धा उमेदवारांना मतदाराला सांगावे लागत आहे. शहरात अनेक समस्या आहे, त्या सुटलेल्या नाही. यामध्ये रस्त्याची दयनिय अवस्था, गल्लीची अस्वच्छता, रस्त्यांवर दुकानांचे वाढलेले अतिक्रमण आदी प्रश्नांचा समावेश आहे. नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडून आल्यानंतर पुन्हा पाच वर्ष अनेक प्रतिनिधी मतदारांना तोंडही दाखवित नाही. निवडणुकीच्या या रणधुमाळीत वाम मार्गाने कमाविलेला पैसा वापरून मतदारांची खरेदीही काहीजण करू पाहत आहेत, या सर्व परिस्थितीत मतदार राजा जागरूक होऊन मतदानाचा हक्क बजावणार आहे. भामरागड नगर पंचायतीसाठी ६५ उमेदवार मैदानात असून त्यातून १७ चांगले उमेदवार निवडण्याची संधी यानिमित्ताने मतदारांकडे चालून आली आहे. या संधीचे मतदार राजा सोन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.