शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

यंदा विवाह साेहळे झाले शाॅर्टकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

२०० ते ३०० किंवा जास्तीत जास्त ४००  लाेकांच्या उपस्थितीत यावर्षी विवाह कार्य पार पाडण्यावर कुटुंबिय भर देणार आहेत. दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात एका मंगल कार्यालयाकडे २० ते २५ लग्न कार्यालयाच्या बुकींग राहत हाेत्या. मात्र यावर्षी त्याची संख्या निम्म्याच्या खाली आहे. लग्न कार्य म्हटले की, बॅन्ड, संदल, फेटे, घाेडा आदीसह विविध प्रकारचा तामझाम राहत असताे. सधन लाेक विवाह कार्यावर लाखाे रुपये खर्च करतात.

ठळक मुद्देअनेकांनी केली बुकींग : डिसेंबर व जानेवारीत माेठ्या प्रमाणात मुहूर्त

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना महामारीने शासकीय नाेकरदार वगळता इतर बहुतांश कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे जुळलेले उपवर-वधूचे विवाह साेहळे कमी लाेकांच्या उपस्थितीत शाॅर्ट बट स्विट पद्धतीने पार पडणार आहेत. तशी माहिती मंगल कार्यालयाचे संचालक व वर-वधू कुटुंबांच्या सूत्रांकडून मिळाली आहे. २०० ते ३०० किंवा जास्तीत जास्त ४००  लाेकांच्या उपस्थितीत यावर्षी विवाह कार्य पार पाडण्यावर कुटुंबिय भर देणार आहेत. दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात एका मंगल कार्यालयाकडे २० ते २५ लग्न कार्यालयाच्या बुकींग राहत हाेत्या. मात्र यावर्षी त्याची संख्या निम्म्याच्या खाली आहे. लग्न कार्य म्हटले की, बॅन्ड, संदल, फेटे, घाेडा आदीसह विविध प्रकारचा तामझाम राहत असताे. सधन लाेक विवाह कार्यावर लाखाे रुपये खर्च करतात. आपल्या आर्थिक ऐपतीनुसार प्रत्येकजण लग्न साेहळे पार पाड पाडताे. मात्र यावर्षी काेराेना संसर्गामुळे श्रीमंत, गरीब, सामान्य व सर्वच कुटुंबांसाठी विवाह साेहळे मर्यादित स्वरूपाचे झाले आहेत. काेराेनामुळे या कार्यातील अनेकांचा राेजगार हिरावला आहे.  

तुळशी विवाहानंतर बार उडणार७ डिसेंबरपासून तुळशी विवाहास प्रारंभ हाेत आहे. साधारणत: तुळशी विवाहानंतरच उपवर-वधूवरांचे विवाह कार्य संपन्न करण्यावर कुटुंबिय भर देतात. नाेव्हेंबर महिन्यात फारसे विवाह साेहळे पार पडणार नाहीत. मात्र (तुळशी विवाह)  डिसेंबर महिन्यापासून लग्न कार्याला वेग येणार आहे. मर्यादित लाेकांच्या उपस्थितीत लग्न साेहळे पार पडणार आहेत. 

एप्रिल, मे मध्ये सर्वाधिक मुहूर्तसन २०२१ मध्ये नवीन वर्षात विवाहासाठीचे सर्वाधिक मुहूर्त एप्रिल व मे महिन्यात आहे. एप्रिल महिन्यातील विवाहासाठी मुहूर्ताच्या तारखा २२, २४, २६, २७, २८, २९, ३० अशा आहेत. एप्रिल महिन्यात सात तारखा आहेत. मे महिन्यात १६ मुहूर्त आहेत. यामध्ये १, २, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २६, २८, २९, ३० या तारखा आहेत. मे महिन्यात विवाह साेहळ्याचा हंगाम जाेमात राहणार आहे. अनेक जाेडपी याच महिन्यात विवाह करतात. 

काेराेना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रम व लग्न समारंभावर बंदी आली. परिणामी मार्चपासून ऑक्टाेबरपर्यंत आम्हा व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. आता अनलाॅक झाल्यापासून शासनाने लग्न समारंभ व कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. मात्र दरवर्षीपेक्षा यंदा निम्म्याच्या खाली मंगल कार्यालयासाठी बुकींग  झाली आहे. काेराेना संसर्गाबाबत मंगल कार्यालयात सॅनिटायझर, मास्कचा वापर करून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. यावर्षी काेराेनामुळे बरेच लाेक मंगल कार्यालयांमध्ये सवलत मागत आहेत. व्यवसाय घसरला आहे. -सुनील पाेरेड्डीवार, सभागृह व मंगल कार्यालय, संचालक, गडचिराेली

 

टॅग्स :marriageलग्न