चैत्र शुद्ध नवमी चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी पुष्प नक्षत्रावर, माध्यान्ही कर्क लग्नि सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला. रामनवमी या दिवशी श्रीरामतत्व १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी ‘श्री राम जय राम जय जय राम’ हा रामजप केल्याने व रामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास सहाय्य होते. प्रभू श्रीरामांचा जन्म मध्यन्हकाळी म्हणजे दुपारी १२ वाजता शंखनाद करून साजरा करतात. त्यानंतर श्रीरामाचा पाळणा लावावा. त्यानंतर आरती करावी, नैवेद्याला सुंठवडा ठेवावा व नंतर तो सर्वांना वाटून द्यावा. कोरोनाच्या संकटकालीन निर्बंधामुळे अशी साधी पूजा सर्वांनी घरी करावी. रामनवमीला अनेक भाविक श्रीरामाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात व दर्शन घेतात. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाचे निर्बंध असल्याने धार्मिक स्थळे बंद आहेत, त्यामुळे भाविकांनी घरीच श्रीरामाची पूजा करून श्रीरामनवमी साजरी करावी.
यावर्षीही रामनवमी साध्या पद्धतीने साजरी करावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST