शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही ‘आदर्श’ शिक्षकांना पुरस्काराची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:00 IST

भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णण यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. देश, राज्य व जिल्हा स्तरावरही पुरस्कार दिले जातात. यावर्षी देशपातळीवरील पुरस्कार जाहीर झाले आहेत. मात्र राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्याबाबत काहीच नियाेजन नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनामुळे यावर्षी जिल्हा व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण केेले जाणार नसल्याने. या पुरस्काराची आस लावून बसलेल्या शिक्षकांचा हिरमाेड झाला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णण यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. देश, राज्य व जिल्हा स्तरावरही पुरस्कार दिले जातात. यावर्षी देशपातळीवरील पुरस्कार जाहीर झाले आहेत. मात्र राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्याबाबत काहीच नियाेजन नाही. यावरून हे दाेन्ही पुरस्कार यावर्षीही दिले जाणार नाहीत, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यस्तरीय पुरस्काराची निवड प्रक्रिया जवळपास तीन महिने चालते. यात वेगवेगळे टप्पे राहतात. तर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर जिल्हास्तरीय समिती निर्णय घेऊन शिक्षकांची निवड करते. यावर्षी मात्र ही प्रक्रिया ठप्प आहे. शिक्षकांकडून अर्जच मागविण्यात आले नाहीत. शिक्षक दिनाचा कार्यक्रम आता जेमतेम १० दिवसांवर येऊन ठेपला आहे.

केंद्राचा पुढाकार, तर राज्य मागे का?काेराेनाचे संकट असतानाही केंद्र शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागून ते जाहीरही केले आहेत. केंद्र शासनाने पुरस्कार जाहीर केले तर राज्याला काय अडचण आहे. असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला जात आहे. केद्र शासनाप्रमाणेच राज्यालाही ऑनलाइन पद्धतीने पुरस्काराचे वितरण करणे शक्य झाले असते. 

काेराेनाकाळात नावीन्याचा शाेध

काेराेनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असतानाही अध्यापन व अध्ययन प्रक्रिया सुरू राहील यासाठी काही शिक्षकांनी अनेक संशाेधन केले आहे. नवनवीन ऑनलाइन साधने शिक्षकांनी शाेधून काढली. आदर्श शिक्षक पुरस्काराच्या माध्यमातून अशा शिक्षकांचा शाेध घेणे शक्य झाले असते. काेराेनाकाळातही काही शिक्षकांनी अतिशय मेहनत घेतली आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान झाल्याने त्यांचा उत्साह वाढला असता.

 

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा