शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

यंदा शिंगाड्याचे उत्पादन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:42 IST

फळवर्गीय पिकात अत्यंत रूचकर व पौष्टिक फळ असणाऱ्या शिंगाड्याची शेती आता कृषीपूरक व्यवसाय ठरत आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, अरसोडा व देसाईगंज तालुक्याच्या चोप (कोरेगाव) येथील कहार व ढिवर समाजबांधव शिंगाड्याची शेती मोठ्या प्रमाणात करीत आहेत.

ठळक मुद्देसोईसवलती मिळण्याची मागणी : पूरक व्यवसाय असलेली शिंगाड्याची शेती फायदेशीर

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : फळवर्गीय पिकात अत्यंत रूचकर व पौष्टिक फळ असणाऱ्या शिंगाड्याची शेती आता कृषीपूरक व्यवसाय ठरत आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, अरसोडा व देसाईगंज तालुक्याच्या चोप (कोरेगाव) येथील कहार व ढिवर समाजबांधव शिंगाड्याची शेती मोठ्या प्रमाणात करीत आहेत. वैरागड भागासह देसाईगंज तालुक्यात यंदा शिंगाड्याचे उत्पादन वाढले आहे.आरमोरी तालुक्यातील वैरागड हे गाव सीताफळ व शिंगाडा फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. सध्यास्थितीत सीताफळाच्या गावाशेजारी असणाºया बागा नष्ट झाल्या असल्या तरी आजही वैरागड येथे काहार समाज बांधव माराई बोडी, महादेव तलाव, जोडतलाव व इतर लहान-मोठ्या तलावात शिंगाड्याचे उत्पादन घेत आहेत.जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली व इतर तालुक्याच्या ठिकाणच्या बाजारपेठेत तसेच आठवडी बाजारात शिंगाड्याची विक्री करून हे समाजबांधव उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र शासनाकडून या शेतीला कोणतेही संरक्षण वा सोयीसवलती देण्यात आल्या नसल्याने शिंगाडे उत्पादकांना प्रसंगी तोटाही सहन करावा लागत आहे.जिल्ह्यातील धान उत्पादकांना तसेच रेशीम शेती उद्योगासाठी शासनाकडून ज्या सवलती मिळतातच त्याच धर्तीवर शिंगाडे उत्पादकांना सोयसवलती देण्यात याव्या, अशी मागणी वैरागड येथील दामोधर भरद्वार, राजू भरद्वार व इतर शिंगाडे उत्पादकांनी केली आहे.कृषी विभागाच्या वतीने शिंगाडे उत्पादनाची शेती व्यापक प्रमाणात होण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलावी, अशीही मागणी होत आहे. सध्या गडचिरोलीसह शहराच्या बाजारपेठेत शिंगाडे फळाला मोठी मागणी दिसून येत आहे.शिंगाड्याची शेती करण्यासाठी तलावात वेल टाकण्यापासून ते बाजारातील ग्राहकापर्यंत आपला उत्पादित माल पोहोचविण्यासाठी अनेक धोके पत्कारावे लागतात. पावसाळ्यापूर्वी तलावात वेल टाकले जात असल्याने अनेकदा ते पुरात वाहून जातात. शिंगाडे पिकावर किडा, टकोराचा प्रादुर्भाव होत असतो. हे पाण्यात होणारे पीक असल्याने अनेक अडचणी येतात. तसेच धोकेही असतात. त्यामुळे शासनाने शिंगाडे शेतीला सोयीसवतली व संरक्षण द्यावे, अशी शिंगाडे उत्पादकांची मागणी आहे.- दामोधर भरद्वार, शेतकरी, वैरागड