शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी मलेरिया नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:44 IST

प्रशासनाने केलेले प्रयत्न व निसर्गाने दिलेली साथ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया (हिवताप) नियंत्रणात असल्याचे दिसून येते. तरीही जुलै महिन्यात दोन नागरिकांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देनिसर्गाने दिली साथ : रुग्णांची संख्या जवळपास निम्म्यावर; दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रशासनाने केलेले प्रयत्न व निसर्गाने दिलेली साथ यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया (हिवताप) नियंत्रणात असल्याचे दिसून येते. तरीही जुलै महिन्यात दोन नागरिकांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे.गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती व वातावरण मलेरियासाठी पोषक आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मलेरियाचा उद्रेक होते. राज्यात सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळत असल्याने मलेरियाबाबत गडचिरोली जिल्हा अतिशय संवेदनशील समजल्या जाते. मलेरियाचा प्रकोप वाढू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करण्यात येत असल्या तरी कधीकधी निसर्ग साथ देत नाही. वातावरण मलेरिया रोगासाठी पोषक बनते. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक आहे. बहुतांश गावे जंगलात वसली आहेत. तसेच धानाची शेती केली जात असल्याने गावाच्या सभोवताल असलेल्या धानाच्या बांधीत पाणी साचून राहते. याच पाण्यात डासांची पैदास वाढते. परिणामी मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सुमारे ५ हजार ४८४ रुग्ण आढळले होते. यावर्षी मात्र त्या तुलनेत रुग्णांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी असल्याचे दिसून येते. जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यापर्यंत केवळ १ हजार ९७७ रुग्ण आढळून आले आहेत. यावरून मागील वर्षीच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असून मलेरिया नियंत्रणात असल्याचे दिसून येते.प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाग्रामीण व दुर्गम भागात प्रामुख्याने मलेरियाचे रुग्ण अधिक आढळतात. मलेरियापासून बचाव करण्यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याने हिवताप कार्यालयातर्फे नागरिकांना औषधभारीत मच्छरदाण्या मोफत वितरित करण्यात आल्या. झोपताना मच्छरदाणीचा अवश्य वापर करावा, याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली. त्याचबरोबर घराच्या सभोवताल पाणी जमा होऊ देऊ नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील आशाकडे औषधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे थंडीवाजून ताप आल्याबरोबर नागरिक आशाकडे जाऊन औषधोपचार करून घेतात. हंगामी क्षेत्र कर्मचारी नेमून त्यांच्या मार्फत घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले. रक्त नमूने गोळा करण्यात आले. एवढेच नव्हे तर संबंधित रुग्णाला स्वत:च्या निगराणीत औषध देत होते. त्यामुळे यावर्षी मलेरिया नियंत्रणात आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक यांनी दिली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य