लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा लागला की वाहतुकीसाठी रस्ते बंद होणारी अजूनही तब्बल २२३ गावे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्या गावांतील नागरिकांना पावसाळ्यात गरजेच्या ठरणाऱ्या आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नियोजन केले जात आहे.दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आढावा बैठक घेऊन संभावित परिस्थितीची माहिती घेतली. त्यात अजूनही जिल्ह्यातील १४४८ गावांपैकी १२२५ गावे बारमाही रस्त्यांनी जोडलेली असून २२३ गावांचा रस्ता पावसाळ्यात बंद होणार असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या नद्या आणि नाल्यांवर नसणारे किंवा कमी उंचीचे असणारे पूल, कच्चा रस्ता या कारणांमुळे हे रस्ते पावसाळ्यात बंद होतात.पावसाळ्यात रस्ता बंद होणाºया गावांमध्ये सर्वाधिक ८२ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. त्यानंतर भामरागड तालुक्यातील ३७, अहेरी तालुक्यातील ३४, धानोरा तालुक्यातील ३० आणि सिरोंचा तालुक्यातील २५ गावांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये काही मोजक्या गावांचा संपर्क तुटतो. देसाईगंज आणि आरमोरी हे दोन तालुके मात्र यासाठी अपवाद असून दोन्ही तालुक्यात सर्व रस्ते बारमाही आहेत.२०१ गावांना पुराची भितीपावसाळा लागला की रस्ते बंद होणाºया २२३ गावांशिवाय केवळ नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते बंद होणारी २०१ गावे आहेत. नदीतील पाण्याची पातळी वाढल्यास किंवा पुलावरून पाणी वाहात असल्याने २०१ गावांचा रस्ता मार्गे असणारा संपर्क तुटतो.
यावर्षीही बसणार २२३ गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:51 IST
पावसाळा लागला की वाहतुकीसाठी रस्ते बंद होणारी अजूनही तब्बल २२३ गावे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. त्या गावांतील नागरिकांना पावसाळ्यात गरजेच्या ठरणाऱ्या आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नियोजन केले जात आहे.
यावर्षीही बसणार २२३ गावांना फटका
ठळक मुद्देपावसाळ्यात रस्ते बंद : प्रशासनाचे मान्सूनपूर्व नियोजन