लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील आयटीआय चौकातील पानटपरीवरील मटका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून २७ हजार ३६५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना बुधवारी घडली.याप्रकरणी निकेश प्रभाकर भुरसे रा. इंदिरानगर गडचिरोली व भुजंग खांडेकर रा. गोकुलनगर गडचिरोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार निकेश भुरसे व भुजंग खांडेकर हे आयटीआय चौकातील पानटपरीवर कल्याण मटका जुगारावर पैसे लावून लोकांना खेळवित होते. पोलिसांनी सापळा रचून पानटपरीवर धाड टाकली. आरोपींची व पानटपरीची झडती घेतली असता, जुगार खेळण्याचे साहित्य व रोख रक्कमेसह २७ हजार ३६५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरूध्द भादंवि कलम १२ (अ) जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलिस हवालदार कान्हू गुरनुले, ओमप्रकाश उंदिरवाडे, प्रेमकुमार दुर्गे, प्रमोद वाळके यांनी केली.
आयटीआय चौकात जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:07 IST
शहरातील आयटीआय चौकातील पानटपरीवरील मटका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून ....
आयटीआय चौकात जुगार अड्ड्यावर धाड
ठळक मुद्देदोघांना अटक : २७ हजारांचा ऐवज जप्त