शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

आरमोरीत मुख्याध्यापकांची कार्यशाळा

By admin | Updated: June 21, 2014 23:59 IST

पंचायत समिती आरमोरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी स्थानिक केंद्रशाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेत प्राथमिक शाळा

आरमोरी : पंचायत समिती आरमोरी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा शनिवारी स्थानिक केंद्रशाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेत प्राथमिक शाळा स्तरावर वर्षभर राबविण्यात येणाऱ्या शालेय उपक्रमांसह सहशालेय उपक्रमांविषयी नियोजन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या करण्यात आले.२६ जूनला सर्वच शाळा सुरु होत आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्वच शाळेतील मुख्याध्यापकांची एक दिवसीय कार्यशाळा येथील केंद्र शाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक शिक्षण विस्तार अधिकारी पितांबर कोडापे , विस्तार अधिकारी नरोटे, केंद्रप्रमुख वसंत राऊत, सुरेश मेश्राम, शंकर बोरकर, डुंबरे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करणे, पटनोंदणी पंधरवाडा, शाळा प्रवेश उत्सव, पालकांच्या भेटी , नवागतांचे स्वागत, शालेय गणवेश योजना, मोफत पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, अभ्यासक्रमाचे वर्गनिहाय नियोजन, शिक्षणाधिकारी यांचे वर्षभरात राबवायचे उपक्रम, केंद्रप्रमुखांचे उपक्रम, शालेय रंगरंगोटी, शालेय स्वच्छता, तसेच यावर्षीपासून जिल्हा परिषद शाळेत सुरु होणाऱ्या ५ व ८ व्या वर्गासंबंधी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. येत्या शैक्षणिक सत्रापासून सर्वच शिक्षकांना आपले ओळख पत्र लावावे लागतील, या विषयी कार्यशाळेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या कार्यशाळेचे संचालन राजेश धात्रक तर आभार प्रदर्शन गुलाब मने यांनी मानले. कार्यशाळेला आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)