आलापल्ली येथे आयोजन : अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनआलापल्ली : महावितरण विभाग आलापल्ली व उद्योग उर्जा व कामगार निरिक्षण विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त शुक्रवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेदरम्यान विद्युत कर्मचारी, यंत्रचालक, शाखा अभियंता, जनमित्र, उपकार्यकारी अभियंता यांना वीज सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला विद्युत निरीक्षण विभागाचे विद्युत निरीक्षक चामटे, सहायक विद्युत निरीक्षक देशमुख, तुतारे, आलापल्ली येथील कार्यकारी अभियंता अमित परांगजपे यांनी मार्गदर्शन केले. जनमित्रांना सुरक्षा बेल्ट व सुरक्षा विषयक माहिती पुस्तीकेचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. वीज दुरूस्तीचे काम करीत असताना सुरक्षा साधनांचा वापर प्रत्येक कर्मचाऱ्याने केले पाहिजे. कार्यशाळेदरम्यान वीज वितरण व्यवस्था, सुरक्षा उपकरणे व त्यांचा वापर विना अपघात काम कसे करावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता पी. के. चव्हाण, सहायक अभियंता सुशांत बावणगडे यांच्यासह आलापल्ली वीज विभाग व कामगार निरीक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यशाळेला वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांसह कंत्राटी पध्दतीवर काम करणारे कर्मचारीसुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वीज सुरक्षेबाबत कार्यशाळा
By admin | Updated: January 17, 2016 01:23 IST