शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

रोहयोतून होणार १२४५ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 01:23 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षाच्या वार्षिक नियोजन आराखड्यास नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली.

ठळक मुद्दे७३ हजार कामांचा समावेश : आगामी आर्थिक वर्षाचा नियोजन आराखडा मंजूर

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षाच्या वार्षिक नियोजन आराखड्यास नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली. या आराखड्यानुसार तब्बल १२४५ कोटी ५९ लाख ८० हजार रुपयांची जिल्हाभरात एकूण ७३ हजार ९२३ कामे होणार आहेत.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्याच्या कलम ४ व २८ अन्वये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तयार करण्यात आली आहे. मग्रारोहयो ही योजना महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात २ फेब्रुवारी २००६ पासून लागू करण्यात आली असून यात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसांचा रोजगार देण्याची कायद्यान्वये हमी असलेल्या या योजनेंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कामे केली जातात. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागामार्फत आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या पूर्वी वार्षिक नियोजन आराखडा तयार केला जातो. त्यानुसार यंदाही असा आराखडा तयार करण्यात आला व या आराखड्यास जि.प.च्या सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली. रोजगार हमी योजनेची कामे ५० टक्के ग्रामपंचायत व ५० टक्के यंत्रणास्तरावर दरवर्षी केली जातात. जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नरेगाची कामे प्राधान्याने घेतली जातात. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण ४५७ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ७३ हजार ९२३ कामे घेण्यात येणार आहे. या कामांसाठी एकूण १२४५ कोटी ५९ लाख ८० हजार रुपयांचा खर्च येणार आहे. जि.प.च्या वतीने तयार करण्यात आलेल्या पुढील आर्थिक वर्षाच्या नियोजन आराखड्यानुसार शासनाकडून प्रस्तावित कामांसाठी निधी प्राप्त होणार आहे. मग्रारोहयोतून सिंचन विहीर, वळण बंधारे, कालव्याची कामे, पिण्याच्या पाण्याची विहीर आदी जलसिंचनाची कामे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय सदर योजनेतून फळबाग, बोळी, मजगी, शेततळे, सिंचन विहीर, शाळा व गावासाठी क्रीडांगण, वैयक्तिक गोठा दुरूस्ती, अंगणवाडी शौचालय, शाळा शौचालय, गांढुळ खत, कंपोस्ट खत आदी कामे होणार आहेत.३४७ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचा प्रयत्नरोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायत व यंत्रणास्तरावर कामे करण्यात येणार असून पुढील वर्षाच्या नियोजन आराखड्यानुसार जिल्हाभरात विविध एकूण ७३ हजार ९२३ कामे होणार आहेत. जि.प.च्या नरेगा विभागाने पंचायत समिती व ग्रामपंचायतनिहाय नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार वर्षभरात एकूण ३४७ लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होणार आहे.ग्रामसभेतून कामांची निवडकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या कामांची निवड ग्रामसभेमधून करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन पुढील आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून करावयाच्या विविध कामाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात नोंदणीकृत मजुराच्या मागणीनुसार त्या-त्या ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये रोहयोतून विविध कामे करण्यात येणार आहेत.