शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्या

By admin | Updated: December 28, 2015 01:39 IST

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

खासदारांचे प्रतिपादन : आलापल्ली येथे प्रशिक्षण वर्गअहेरी : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती गोरगरीब नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. आलापल्ली येथील राम मंदिरात पंडीत दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप शुक्रवारी करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, अहेरी विधानसभा प्रमुख बाबुराव कोहळे, प्रशिक्षण प्रमुख प्रकाश गेडाम, भाजपा किसान मोर्चा सदस्य रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, प्रकाश दत्ता, अहेरी तालुका अध्यक्ष विनोद अकनपल्लीवार, दामोधर अरिगेला, अब्बास शेख, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती सुवर्णा खरवडे, भामरागड पंचायत समितीच्या सभापती रंजना उईके, सिरोंचा तालुकाध्यक्ष संदीप राचर्लावार एटापल्ली तालुकाध्यक्ष बाबुराव गंप्पावार, सुभाष गणपती, सुनील बिश्वास, एटापल्ली पंचायत समिती सभापती दीपक फुलसंगे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले की, पक्ष संघटनेसाठी झटणारा सर्वसामान्य कार्यकर्ता हाच खरा पक्ष व जनता यांच्यामधील महत्त्वाचा दूवा आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे, शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले पाहिजे, असे प्रतिपादन अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षणात पक्ष संघटन, सरकार, शासनाच्या जनहितकारी योजना माध्यमे आदी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. संचालन भारतीय जनता पार्टी अहेरी तालुका महामंत्री सतीश गोटमवार तर आभार रमेश समुद्रालवार यांनी मानले. प्रशिक्षणाला अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)