शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तीन सभापतींचे आवारातून कामकाज

By admin | Updated: June 1, 2016 02:02 IST

नगर पंचायतीच्या सर्व सभापतींना व मुख्याधिकाऱ्यांना बसून कामकाज सांभाळण्यासाठी स्वतंत्र कक्षाची गरज आहे.

एटापल्लीतील प्रकार : नगर पंचायतीच्या विद्यमान इमारतीत जागेचा अभावएटापल्ली : नगर पंचायतीच्या सर्व सभापतींना व मुख्याधिकाऱ्यांना बसून कामकाज सांभाळण्यासाठी स्वतंत्र कक्षाची गरज आहे. नव्हे तो त्यांचा अधिकार आहे. मात्र अपुऱ्या जागेअभावी नगर पंचायतीचे पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती जितेंद्र टिकले, महिला व बालकल्याण सभापती सगुणा हिचामी, बांधकाम सभापती दीपयंतीप् पेंदाम यांना नगर परिषदेच्या खुल्या आवारात खुर्च्या व टेबल लावून कामकाज करावे लागत आहे. सदर प्रकार एटापल्ली नगर पंचायतीमध्ये पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे या नगर पंचायतीत कार्यरत मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र कक्ष नाही. नगर पंचायत अस्तित्वात येऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र नगर पंचायतीच्या नव्या इमारत बांधकामास मंजुरी मिळाली नाही. परिणामी नगर पंचायतीचा कारभार चालविण्यासाठी पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १९६१ मध्ये एटापल्ली ग्रा. पं. ची स्थापना झाली. त्यावेळी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर वनकार्यालयाजवळ ग्रामपंचायतीची कौलारू इमारत बांधण्यात आली. तब्बल २३ वर्षानंतर या कौलारू इमारतीची दुरूस्ती १९९४ मध्ये करून स्लॅबचे छत तयार करण्यात आले. २३ एप्रिल २०१५ पासून ग्रा. पं. ला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. मात्र तेव्हापासून नगर पंचायतीचा कारभार ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीतून सुरू आहे. येथील मुख्याधिकारी आर. बी. मेश्राम यांच्यासह तीन सभापती जागेअभावी मिळेल त्या ठिकाणी खुर्च्या-टेबल लावून कामकाज करीत असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. पाणीपुरवठा सभापती रमेश टिकले, महिला व बालकल्याण सभापती सगुणा हिचामी खुल्या आवारात टेबल-खुर्च्या लावून काम करताना दिसून आले. नगर पंचायतीच्या इमारतीत तीन खोल्या असून एका खोलीत कर्मचारी काम करतात. याच खोलीमध्ये संगणक व इतर साहित्य आहे. याच खोलीत मासिक सभा व इतर बैठका घेतल्या जातात. दुसऱ्या खोलीत मुख्याधिकारी व सभापतींचे कामकाज चालविले जाते. कामकाज सुरळीत होण्यासाठी शासनाने नगर पंचायतीच्या नव्या इमारतीसाठी जागा शोधून मंजुरी प्रदान करावी, अशी मागणी पाणीपुरवठा सभापती जितेंद्र टिकले यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)